हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गरिबी असणे किंवा नसणे, यामागे ‘प्रारब्ध’ असे काही आहे’, हे ज्ञात नसलेले साम्यवादाच्या गप्पा मारतात आणि गरिबी असणारे किंवा नसणारे यांना समान करण्याचा प्रयत्न करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदू इतर धर्मियांना केवळ साधना शिकवतात. हिंदू इतर धर्मियांप्रमाणे इतरांचे धर्मांतरण करत नाहीत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ख्रिस्ती, मुसलमान इतरांचे धर्मांतरण करतात, ते स्वत:चे संख्याबळ वाढावे म्हणून. याउलट हिंदू इतर धर्मियांना धर्म शिकवतात, तो इतर धर्मियांना मोक्ष मिळावा म्हणून !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे बुद्धीगम्य ज्ञान शिकवणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे बुद्धीलय शिकवणारे अध्यात्मशास्त्र ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात, तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’
‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पैसे अशाश्वत आहेत. संतांनी दिलेला आशीर्वाद अखंड टिकणारा आहे. अखंड म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत टिकणारा आहे.