
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – ‘महारुद्र बाजीप्रभू देशपांडे प्रतिष्ठान’ आणि ‘कमळोजी साळुंखे प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ शिवभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडले. १८ आणि १९ जुलै असे २ दिवस हे अभियान घेण्यात आले. श्री. योगेश केरकर यांनी या पदभ्रमणाचा उद्देश स्पष्ट केला. या ऐतिहासिक सोहळ्यास महारुद्र बाजीप्रभू देशपांडे यांचे ११ वे वंशज श्री. संदेश देशपांडे आणि कमळोजी साळुंखे यांचे वंशज श्री. सुहास साळुंखे उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रतापगडाच्या युद्धात वापरलेल्या ऐतिहासिक दुर्मिळ तलवारीचे मान्यवरांच्या शुभहस्ते विधीवत् पूजन करण्यात आले. या ऐतिहासिक पदभ्रमणात संगीता फुलारी, राजेश कदम, सपना मालगावे, महेश सोनंदकर यांच्यासह अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली