राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांचा सहभाग

नवी देहली – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन केले. या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षानेते राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियांका वाड्रा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिलकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे हा सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसर असल्याने तेथे आंदोलनांना अनुमती दिली जात नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांना हटवण्यासाठी पोलीस आले; परंतु काँग्रेस कार्यकर्ते तेथेच थांबून राहिले. काँग्रेसने कुणालाही न कळवता अत्यंत गुप्तपणे या आंदोलनाची सिद्धता केली होती. या अचानक झालेल्या आंदोलनावर कारवाई करत पोलिसांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह अनेक नेत्यांना कह्यात घेतले. तरीही येथे आंदोलन चालू होते.
जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पक्षा’चे आंदोलन चालूच
जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पक्षा’चे आंदोलन २१ जुलैला ३२ व्या दिवशीही करण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत सहस्रो आंदोलक आंदोलनस्थळी पोचले होते. सकाळी सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस आले असता आंदोलनकर्त्यांनी ‘देहली पोलीस मुर्दाबाद!’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी २० जुलैला संध्याकाळी आंदोलकांना जंतरमंतरवरून हटवले होते; परंतु ते रात्री उशिरा पुन्हा एकत्र जमले.
‘कॉकरोच जनता पक्षा’चे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले की, आम्ही आज संसदेवर मोर्चा काढणार नाही; कारण या सरकारने आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांचे रक्त सांडले आहे. त्यांना विद्यार्थ्यांची पर्वा नाही; पण आम्हाला आहे. (विद्यार्थ्यांना पोलिसांची आणि सरकारी मालमत्तेची पर्वा आहे का ?, याचे उत्तर दीपके का देत नाहीत ? – संपादक)
सोनम वांगचुक यांना दुसर्या रुग्णालयात हलवण्याचा न्यायालयाचा आदेश
देहली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयामध्ये हलवण्याचा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, त्यांच्या उपचारासाठी मेदांता डॉक्टरांचे पॅनेल सिद्ध करेल. वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंगमो यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने हा आदेश दिला. वांगचुक २४ दिवसापासून उपोषण करत आहेत. २० जुलैला ते म्हणाले होते की, पोलिसांचे क्रौर्य पाहिल्यानंतर मी माझे उपोषण चालूच ठेवणार आहे. (आंदोलनकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारात ११५ हून अधिक पोलीस घायाळ झाले, पोलिसांची आणि खासगी वाहने यांची तोडफोड करण्यात आली, हे क्रौर्य नाही का ? ती गांधीगिरी होती, असे वांगचुक यांना वाटते का ? – संपादक)
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !