पुणे, १३ सप्टेंबर – खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. प्रथमच ही चार धरणे एकाचवेळी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. परिणामी खडकवासला धरणातून ८४८ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे.
या धरणांची १०० टक्के पातळी कायम ठेवत, पावसाचे पडणारे पाणी नदीत सोडून देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत, तसेच मुठानदी किनारी रहाणारे नागरिक आणि गावांना सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही दिल्या आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी दिली.