पुणे येथे १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस !

१४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्थानकावरून घरी सोडण्याचे खोटे आमीष दाखवून तिला शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक आणि खडकी परिसरातील ‘लॉज’वर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विश्व हिंदु परिषद पूर्वच्या वतीने जावेद अख्तर यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची तुलना जावेद अख्तर यांनी तालिबान्यांशी केली होती. त्यामुळे विश्व हिंदू परिषद पूर्वच्या वतीने जावेद अख्तर यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.

श्री गणेशमूर्तींच्या भावात २० ते २५ टक्के वाढ होऊनही पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच मूर्तींना पुणेकरांची पसंती !

पर्यावरणपूरक शाडू, तसेच लाल मातीच्या मूर्तींची अनुमाने ६० टक्के नोंदणी झाल्याचे काही स्टॉलधारकांकडून सांगण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक स्पर्धेतून दिशाभूल !

प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.

पुणे येथे स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘सहकारनगर नागरिक मंच’ची स्थापना !

शहरातील विकास नागरिकांच्या करातून केला जातो; मात्र हा विकास नागरिकांच्या हितासाठी आणि योग्य व्यय करून केला जातो का ?, हे लक्षात यावे यासाठी आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवणे यांसाठी ‘सहकारनगर नागरिक मंच’ची स्थापना केली.

पारपत्राची मुदत संपल्याने अफगाणी विद्यार्थी चिंतेत

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या १ सहस्र ४०० अफगाणी विद्यार्थ्यांपैकी १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या पारपत्राची (‘व्हिसा’) मुदत संपली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची, तसेच पारपत्राची मुदत वाढवून देण्याची मागणी अफगाणी विद्यार्थी करीत आहेत.

पुणे येथे श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप सत्संगाला धर्मप्रेमींचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सत्संगाच्या आरंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद कालगांवकार यांनी श्रीकृष्ण जयंतीचे महत्त्व सांगितले, तसेच सर्वांकडून सामूहिक प्रार्थना करवून घेतली. नंतर सर्वांनी सामूहिक ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप केला.

शमी आणि जास्वंद यांच्या बियांचे रोपण करून श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्या !

पर्यावरणप्रेमींचे प्रेम केवळ हिंदूंच्या उत्सवांवरच का ? बकरी ईदला पर्यावरणविषयक सल्ला देण्यास जाण्याचा विचार पियुष शाह करू शकतात का ? ‘पर्यावरणप्रेमी हिंदूंची दिशाभूल करून धर्माचरणापासून त्यांना कसे अलगद परावृत्त करतात’, याचे हे उत्तम उदाहरण आहे !

पुण्याजवळील घाट माथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’ !

शहर आणि परिसरातील घाट भागात पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत घाट भागात ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

सरकारी कार्यक्रमात गर्दी चालते, मग गणेशोत्सव आणि दहीहंडीला का नाही ? – राज ठाकरे

सरकार कोरोनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या लाटांची भीती दाखवत आहे; मात्र भीती दाखवून सरकार सर्व करत असेल, तर हे कुठपर्यंत चालणार ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.