आपत्काळात राजकारण नको !

आपत्काळात राजकारण नको !

कोल्हापूरला आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना अनेक लोकप्रतिनिधींनी साहाय्य पाठवले आहे. यातून सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींनी बोध घेऊन, तसेच राजकारण थांबवून लोकांना साहाय्य करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.

राष्ट्रनिष्ठ लोकप्रतिनिधी आणि जनता हवी !

राष्ट्रनिष्ठ लोकप्रतिनिधी आणि जनता हवी !

आज आपला देश उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे नेतृत्व आणि मावळ्यांसारखी जनता असणे आवश्यक आहे. असे नेतृत्व आणि जनता मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, हे निश्चित !

नक्षत्रांचे देणे !

नक्षत्रांचे देणे !

अभ्यासक्रमांत प्राचीन भारतीय शास्त्राचा समावेश करायला हवा. तसेच जे अभ्यासक या शास्त्रासाठी योगदान देत आहेत, त्यांचा उचित सन्मान करायला हवा. विरोध करणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आवर घालायला हवा. राष्ट्रहितासाठी हे आवश्यक आहे !

‘कॅट’चे आवाहन !

‘कॅट’चे आवाहन !

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) देशभरात ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम २१ जुलै २०२१ पासून चालू केली आहे.

कर्जबुडव्यांना अभय का ?

कर्जबुडव्यांना अभय का ?

ज्या अधिकोषांनी, तसेच तेथील अधिकार्‍यांनी प्रत्यक्षात तारण नसतांना एवढे कर्ज दिले आणि इतकी वर्षे वसुलीसाठी दिरंगाई केली त्यांनाही उत्तरदायी धरून पुढील कारवाई व्हायला हवी.

विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच..!

विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच..!

हिंदुद्वेष्टे यांनी हिंदु धर्माच्या विरोधात कितीही गरळओक केली, तरी हिंदूंच्या मनातील भगवंतभेटीचा भक्तीरस अखंड वहात आहे, जो वारीच्या निमित्ताने अनुभवता आला. वारीच्या दिवशी  प्रत्येक हिंदूच्या मनात विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच अनुभवता आला !

‘डान्सबार’ कुणामुळे चालू ?

‘डान्सबार’ कुणामुळे चालू ?

डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. वरील वृत्ताच्या निमित्ताने विषयाला आरंभ झालेलाच आहे, तर प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन डान्सबार कायमस्वरूपी कसे बंद होतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

शिक्षणाची टक्केवारी !

शिक्षणाची टक्केवारी !

नुकताच इयत्ता १० वीचा निकाल घोषित झाला. कोरोनामुळे यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले. त्यात ९०० हून अधिक मुलांना १०० टक्के, तर ८० सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या वर गुण देण्यात आले. यामुळे शिक्षणाच्या टक्केवारीवरच प्रश्नचिन्ह उठू लागले.

सहकारी संस्थांना पुनर्वसनाची संधी !

सहकारी संस्थांना पुनर्वसनाची संधी !

सहकार मंत्रालयाने सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप संपवण्यासाठी प्रयत्न करून सहकारी संस्थांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. या संस्थांना कायदेशीर नियंत्रणाखाली आणण्यासाठी सहकार मंत्रालय मोलाची कामगिरी बजावू शकेल, अशी अपेक्षा !

अमली पदार्थांच्या तस्करीचे मूळ नष्ट करा !

अमली पदार्थांच्या तस्करीचे मूळ नष्ट करा !

पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ब्राऊन शुगर विकणार्‍या डिका थोरात या महिलेला अटक करण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार यापूर्वीही अनेकदा उघड झाले आहेत. हा अपप्रकार देशाला आतून खिळखिळे करू शकतो.