पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली !

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण आणि निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला आहे. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवार यांच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ३० डिसेंबर या दिवशी त्यांच्या शोकभावना व्यक्त केल्या.