कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची चतुर्थीला कुष्मांडा रूपातील पूजा !
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची चतुर्थीला कुष्मांडा रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची चतुर्थीला कुष्मांडा रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची तृतीयेला श्री कामाक्षीदेवीच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
महागौरी ही गौरवर्णाची आहे. अष्टवर्षा भवेद गौरी म्हणजे ती ८ वर्षांची आहे. वस्त्रालंकार श्वेतवर्णाचे असून देवी चतुर्भुज आहे. तिचे वाहन वृषभ आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सिंहासनारूढ रूपातील पूजा प्रतिपदेला बांधण्यात आली होती. श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान येथेही श्री जोतिबा देवाची राजदरबारी राजेशाही थाटातील बांधलेली बैठी सालंकृत महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता घंटानाद होऊन मंदिर उघडले आणि त्यानंतर राज्यभरातून आलेल्या भाविकांनी…
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नवरात्रोत्सव काळात भाविकांची संख्या वाढल्याने वाहनतळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन ‘इंडोकाऊंट फाऊंडेशन’कडून महिला आणि पुरुष भाविक यांच्यासाठी स्वतंत्र ‘स्टेनलेस स्टील’मधील मोबाईल (फिरती) स्वच्छतागृहे देवस्थान समितीला सुपुर्द करण्यात आली.
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक !
चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचे सांगत प्रशासनाकडून चप्पल स्टँडचालकांना नोटीस देण्यात आली होती.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविक केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तसेच अन्य राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात येतात. आता सर्वसाधारणपणे प्रतिदिन ५ सहस्र भाविक दर्शन घेत आहेत. नवरात्रात हा आकडा लाखात जातो. त्यामुळे यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
करवीर (कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. श्री महालक्ष्मीदेवीचे हे स्थान आजही जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.