कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात धर्मशास्त्र अभ्यासक म्हणून एकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहिता असतांना वर्ष २०२२ च्या पोटनिवडणुकीत विज्ञापन काढून हे पद भरण्यात आले होते. हे धर्मशास्त्र अभ्यासक केवळ दहावी उत्तीर्ण असून त्यांनी मंदिरात नसलेल्या प्रथा चालू केल्या आहेत. तरी या धर्मशास्त्र अभ्यासकांना निलंबित करा, अशी मागणी ‘श्री करवीरनिवासिनी महिला बहुउद्देशीय संस्थे’ने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे की, श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात कोणतीही कृती करतांना ती पुरातत्व विभागाची अनुमती घेऊन करणे आवश्यक आहे. असे असतांना नवग्रह मंडपाजवळ ‘हवन कुंड’ सिद्ध करून घेण्यात आले आहे. याचा कधीही वापर झाला नाही. असे कुंड निर्माण केल्याने नवग्रह मंडपासारख्या ऐतिहासिक शिल्पांना धोका निर्माण झाला आहे. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा संगीता खाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? मंदिर प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? |