
पणजी, १८ जुलै (वार्ता.) – १८ जुलै ते २४ जुलै या कालावधीत गोव्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या ७ दिवसांच्या कालावधीत मध्यम पावसाची शक्यता असून कोणत्याही जिल्ह्यासाठी हवामान खात्याने कोणतीही गंभीर चेतावणी दिलेली नाही; मात्र विशेषतः सखल आणि पूरप्रवण भागातील रहिवाशांना सतर्क रहाण्याचा आणि हवामानाविषयक अद्ययावत माहिती पहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
धारबांदोडा येथे २४ घंट्यांत सर्वाधिक ८२.४ मि.मी. पावसाची नोंद
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै या दिवशी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ घंट्यांच्या कालावधीत गोव्यामध्ये धारबांदोडा येथे सर्वाधिक ८२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. केपे (६०.२ मि.मी.), सांखळी (५२.४ मि.मी.), फोंडा (५०.८ मि.मी.), सांगे (४८.५ मि.मी.) आणि जुने गोवे (२२.६ मि.मी.) या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पेडणे (९.६ मि.मी.), मडगाव (८.६ मि.मी.), दाबोळी (७.८ मि.मी.), काणकोण (७.४ मि.मी.), म्हापसा (६.२ मि.मी.) आणि पणजी (४.६ मि.मी.) मुरगाव (२.२ मि.मी.) याप्रमाणे अल्प प्रमाणात पावसाची नोंद झाली. या कालावधीत राज्यातील कोणत्याही केंद्रावर अतीवृष्टी किंवा अत्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली नाही.
वेळुस, सत्तरी येथे मुसळधार पावसामुळे शेती आणि बागायती यांची हानी
वाळपई – सत्तरी तालुक्यात वेळूस परिसरात १७ जुलैच्या अवघ्या एका रात्रीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती आणि बागायती यांची मोठी हानी झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे आणि सुपारीच्या बागायती पाण्याखाली गेल्या आहेत. यांमुळे पिकांची मोठी हानी झालेली आहे. स्थानिक शेतकरी रामा गावकर म्हणाले, ‘‘एका रात्रीत झालेल्या पावसामुळे येथील परिस्थिती गंभीर बनली आहे.’’
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !