जिहादी आतंकवाद्यांचा ठावठिकाणा शोधून देतांना वीरमरण आलेल्या सैन्य दलाच्या श्‍वानाला मरणोत्तर पुरस्कार !

जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्‍वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.

बांदीपोर्‍यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !

कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !

अमरनाथ यात्रेवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कठोरात कठोर कारवाईन केल्यानेच प्रतिवर्षी आतंकवादी हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करतात ! ही स्थिती आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !

‘जी २०’ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये घेण्यास चीनचा विरोध !

‘चीनने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये अन्यथा चीनकडून शिनजियांगमध्ये मुसलमानांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी भारत तोंड उघडेल’, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावण्याची आवश्यकता आहे !

डॉ. मुखर्जींच्या बलीदानामुळे काश्मीर आज भारतात ! – प्रकाश बिरजे, भाजप

आपल्या देशाच्या एका राज्यात भारतियांना प्रवेश करण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, हे लज्जास्पद आहे, असे म्हणून डॉ. मुखर्जींनी आंदोलन केले. अटकेच्या कालावधीत डॉ. मुखर्जींचे निधन झाले. शामाप्रसादांच्या बलीदानामुळे काश्मीर भारतात राहिले.

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील वर्षी होणार ‘जी-२०’ समुहाची बैठक

वर्ष २०२३ मध्ये भारत ‘जी-२०’ या समुहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. त्यामुळे या बैठकीचे आयोजन जम्मू-काश्मीरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने ५ सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे.

पुलवामामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आतंकवाद्यांकडून हत्या  

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !

काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

काश्मीरमध्ये मे मासात काश्मिरी मुसलमान तरुणांची आतंकवादी होण्याच्या संख्येत वाढ !

या वर्षातच सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार !

(म्हणे) ‘भारताने काश्मिरींच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करू नये !’

काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्या संदर्भात भारताने काय करावे आणि काय करू नये, हे जर्मनीने भारताला सांगण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भारताने जर्मनीच्या राजदूतांना सुनावले पाहिजे !