जम्मू-काश्मीरमध्ये पुढील वर्षी होणार ‘जी-२०’ समुहाची बैठक

जम्मू (जम्मू-काश्मीर) – वर्ष २०२३ मध्ये भारत ‘जी-२०’ या समुहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. त्यामुळे या बैठकीचे आयोजन जम्मू-काश्मीरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने ५ सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे. या बैठकीच्या माध्यमांतून जम्मू-काश्मीरवरून जगभरात पाककडून होणारा दुष्प्रचार खोडून काढण्यात येणार आहे. भारताकडे १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ‘जी-२०’ समुहाचे अध्यक्षपद असणार आहे. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये अशी पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.

‘जी-२०’मध्ये सहभागी देश

भारत, अमेरिका, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझिल, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली,  ब्रिटन, युरोपीय संघटना, रशिया, तुर्कीये, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.