पुलवामामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आतंकवाद्यांकडून हत्या  

पोलीस उपनिरीक्षक फारुख अहमद

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी येथील पंपोर भागात फारुख अहमद या पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांचा मृतदेह येथे आढळला आहे. त्यांच्या शरिरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आहेत. फारुख अहमद आय.आर्.पी.मध्ये तैनात होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका 

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !