‘आजीची भाजी रानभाजी’ – बहुऔषधी भारंगी…
पोटात कृमी (जंत) झाल्यास पाने शिजवून त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे. भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात. दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात भारंगीच्या पानांची भाजी वापरतात. कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते.