मुलांना पुढे जाऊन आरोग्यासाठी त्रासदायक ठरतील, अशा पुढील २ गोष्टी पालक म्हणून अधिकाधिक पाळायचा प्रयत्न करावा, असे एक आई आणि वैद्या म्हणून वाटते.

१. उपाहारगृहात गेल्यावर मजा करायला आलो आहे, तर त्यांना ‘हवे ते’ आणि ‘हवे तितके’ खायला देणे. सध्या सर्वांचेच सतत या ना त्या निमित्ताने उपाहारगृहात जाणे होत असते. अशा वेळी काय खायचे ? आणि किती वारंवार खायचे ?, हा भाग लहानपणापासून सांगायला हवा.
२. मुलांसाठी पूर्णपणे हानीकारक असलेल्या पदार्थांना बिनधास्तपणे ‘नाही’ म्हणायला हरकत नाही, जरी ती रडली तरीही ! जसे की ‘प्रोसेस्ड चीज क्युब’ (प्रक्रिया केलेले चीज), रंग घातलेले जॅम, जेली आणि केक, चायनीज पदार्थ अन् विशेषकरून पूर्णपणे पामतेलात तळलेले चिप्स वगैरे. हे मान्यच आहे की, शेंगदाण्याचे तेल (ग्राऊंडनट ऑईल) लिहितांना त्यातही परत भेसळ असेल; पण अगदी उघड्या डोळ्यांनी पामतेल असे लिहिलेले पदार्थ तरी टाळावेत.
लहान मुलांचे वजन वाढण्यामागील कारण
वर्ष १९७५ ते वर्ष २०१६ मध्ये लहान मुलांमध्ये वजनवाढीचे प्रमाण ४ टक्क्यांवरून १९ टक्क्यांपर्यंत गेले आहे. वर सांगितलेल्या दोन्ही प्रसंगांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ हे अधिक खारट, आंबट आणि ‘नमकीन’ वर्गात जातात. हे पदार्थ लहान मुलांचे केस, त्वचा आणि बुद्धी यांना हानीकारक आहेतच, त्यासह पोटातील ‘अग्नी’वर कायमचा परिणाम करून त्या विशिष्ट पदार्थांचे ‘क्रेव्हिंग’ (खाण्याची इच्छा) निर्माण करून वजन वाढवत न्यायला कारणीभूत ठरतात. सध्याच्या संशोधनानुसार प्रक्रिया केलेले पदार्थ हे पोषकांश नसलेले, गट ‘फ्लोरा’मधील चांगले ‘बॅक्टेरिया’ पूर्ण मारणारे आणि शरिरात विदाह उत्पन्न करणारे आहेत. यामुळे लहानपणापासून वजनवाढ आणि त्यामुळे थायरॉईड, कोलेस्ट्रॉल अन् अन्य आजार यांना निमंत्रण मिळते. बाकी आजार जसे व्हायचे ते होणार; पण आपल्या निष्काळजीपणामुळे होऊ नयेत आणि त्यातल्या त्यात आटोक्यातील अन् पद्धतशीर पालट घडवणारे नसावे एवढेच !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे झालेला अद्वितीय लाभ !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?