८ महिने ते २ वर्षे वयाच्या बालकांना आहार म्हणून पाकीटबंद पदार्थ सोडून काय देता येईल ? याची सूची येथे देत आहे.

फोडणी दिलेले वरण-भात, घावन, तांदूळ, नाचणी आणि ताक घालून उकड, आमटी (लसूण, कोथिंबीर, गोड मसाला) + भात, तूप, जिरे, दूध-पोळी कुस्करून (मीठ न घातलेल्या कणकेची पोळी), दही-ताक भात, पोळी भाजी, उकड काढून केलेली भाकरी कुस्करून आमटी किंवा ताकासह, गाजर-कोथिंबीर पराठा, टोमॅटो ‘प्युरी ’ (रस) घालून केलेले बेसन धिरडे, इडली, गूळ-पोळीचा लाडू, नाचणी किंवा मूग डोसा, दही भात, आमटी भाजी एकत्र, बटाटा उकडून, गाजर, पनीर बारीक किसून कणकेत घालायचे. एकदम मऊ पराठा होतो. तूप मेतकूट भात, डाळ तांदूळ खिचडी, कढी.

न्याहारी आणि मधल्या वेळी खाण्याचे पदार्थ
रवा + लाल भोपळा यांची खीर, पोहे; बटाटा, बीट, गाजर, मटार यांचे एकत्र कटलेट, ज्वारी लाही पीठ + दूध + साखर, पालक सूप किंवा अन्य सूप, मीठ घालून लाल भोपळा उकडून, लाह्यांचा चिवडा, मखाणे (तूप-मीठावर भाजून), लाडू, शिरा, हिरव्या मुगाचे सूप, फळे, शेवयांचा उपमा, मटारचे दाणे, कडधान्ये, दाणे उकडून, तूप जिर्यावर परतलेल्या लाह्या.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंडये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद
पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी
वर्षा ऋतूचर्या : पावसाळ्यात आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन !
जेवतांना भ्रमणभाष पहात आहात का ? वेळीच व्हा सावध !