जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !

श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.

विज्ञान आणि अध्यात्म यांतील नेमका भेद !

‘विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते !’

सात्त्विकतेची ओढ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील चि. अर्जुन चेतन खैरे (वय १ वर्ष) !

तो उठल्यावर आम्ही ‘जय श्रीकृष्ण’, असे म्हटल्यावर तो दोन्ही हात वर करतो आणि हसतो. त्याला ‘कृष्णबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यावर तो भिंतीवरील कृष्णाच्या चित्राकडे पाहून बोट दाखवतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि ‘साधकांचा उद्धार व्हावा’, यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर होतात. ‘गुरुदेवांनी सांगितलेली साधना कशी करायला हवी ?’, यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करतात.

विश्वभर व्हावे गुरुकार्याचे संकीर्तन।

विश्वभर व्हावे गुरुकार्याचे संकीर्तन। हाच तुझा ध्यास, हेच तुझे चिंतन मनन।।
जैसे तुजला अपेक्षित तैसी भावसेवा घडावी। प्रार्थना ही अज्ञानी बालकाची स्वीकारावी।।

भारतातील संतांचे महान कार्य !

भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही समष्टी सेवा करून घेऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

५.५.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना होणारे तीव्र शारीरिक त्रास आणि त्यावर केले जाणारे उपचार’ पाहिले. आता या भागात ‘अशा स्थितीतही त्यांनी कशा सेवा केल्या ?’ ते येथे दिले आहे.

‘आध्यात्मिक मानवतावाद आणि आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे इंडोनेशिया या देशातील सात्त्विक आश्रम आणि त्यांचे साधक !

स्वामी श्री. आनंद कृष्णा सिंधी वंशाचे असून इंडोनेशिया हे त्यांचे जन्मस्थान आहे. ते इंडोनेशिया येथील ‘आध्यात्मिक मानवतावाद, तसेच आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक आहेत. त्यांनी विपुल लेखनकार्यही केले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार होत असलेले सनातनच्या ग्रंथनिर्मितीचे कार्य आणि ग्रंथांतील चैतन्यामुळे सर्व स्तरांवर होणारे लाभ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वेगवेगळ्या विषयांवर ५ सहस्र ग्रंथांची निर्मिती करण्याचा संकल्प आहे. या ग्रंथांची, म्हणजे ‘कलियुगातील पाचव्या वेदा’ची निर्मिती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याद्वारे चालू आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली. या लेखमालेत त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन देत आहोत.