सेवाकेंद्रातील बालसंस्‍कारवर्गाचे दायित्‍व सांभाळणारी कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील ५४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. वैदेही मनोज खाडये (वय १७ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. वैदेही मनोज खाडये ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२२ मध्‍ये कु. वैदेही हिची आध्‍यात्मिक पातळी ५४ टक्‍के होती.’ – संकलक)

आश्विन कृष्‍ण चतुर्थी (१.११.२०२३) या दिवशी कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील कु. वैदेही मनोज खाडये हिचा १७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये आणि तिला आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

कु. वैदेही मनोज खाडये

कु. वैदेही मनोज खाडये हिला १७ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

१. वडिलांना सेवांचा ताण आला असतांना सेवांचे नियोजन करण्‍यास साहाय्‍य करून त्‍यांना धीर देणे

‘एकदा एकाच वेळी अनेक सेवा आल्‍यामुळे मला (कु. वैदेही हिचे वडील श्री. मनोज खाडये यांना) ताण आला होता आणि माझी थोडी चिडचिडही होत होती. त्‍या वेळी कु. वैदेहीने मला शांतपणे विचारले, ‘‘बाबा, तुम्‍हाला कोणकोणत्‍या सेवा आहेत ? त्‍या प्रत्‍येक सेवेला किती वेळ लागणार आहे ? त्‍यातली कोणती सेवा प्राधान्‍याची आहे ?’’ त्‍यानंतर तिने मला सेवेचे नियोजन करण्‍यास साहाय्‍य केले आणि ‘माझ्‍याकडील सेवा अल्‍प वेळेत होऊ शकतात’, हे सांगून मला धीर दिला.

२. एखाद्या विषयावर चर्चा करत असतांना आम्‍हा उभयतांमध्‍ये (पती-पत्नी यांच्‍यामध्‍ये)  कधीतरी वाद होत असेल, तर वैदेही मध्‍येच एखादे चांगले सूत्र सांगते. त्‍यामुळे आमच्‍या विचारांची दिशा पालटून वातावरण सकारात्‍मक होते.

३. सेवाकेंद्रातील बालसाधकांच्‍या साधनेचा आढावा घेतांना त्‍यांच्‍याशी जवळीक साधणे : सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी वैदेहीला कुडाळ सेवाकेंद्रातील बालसाधकांच्‍या साधनेचा आढावा घेण्‍यास सांगितले. वैदेहीने १ – २ मासांतच सर्व बालसाधकांशी जवळीक केली. ती ‘बालसाधकांच्‍या वेळेचे नियोजन करणे, ‘आध्‍यात्मिक प्रश्‍नमंजुषे’च्‍या अंतर्गत रामायण, महाभारत, यांवर आधारित प्रश्‍नोत्तरांचा खेळ घेणे, एकाग्रता वाढवणारे खेळ घेणे’ इत्‍यादी माध्‍यमांतून त्‍यांना शिकवण्‍याचा प्रयत्न करते. त्‍यामुळे सर्व बालसाधक तिचे म्‍हणणे ऐकतात. आठवड्यातून एकदा ती सेवाकेंद्रातील बालसाधक आणि प्रसारातील काही साधकांची मुले यांचा ‘ऑनलाईन’ बालसंस्‍कारवर्गही घेते.

४. मागील वर्षभरात तिने जी चित्रे काढली आहेत, त्‍यांमध्‍ये तिने पूर्वी काढलेल्‍या चित्रांच्‍या तुलनेत प्रगल्‍भता जाणवते.

५. अनुभूती

प्रार्थना करून ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १)’ या ग्रंथातील पान उघडल्‍यानंतर मनातील प्रश्‍नाचे उत्तर मिळणे : सनातनचा ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १)’ हा ग्रंथ तिला फार आवडतो. जेव्‍हा तिच्‍या मनात काही प्रश्‍न येतात, तेव्‍हा प्रार्थना करून ती ग्रंथ उघडते आणि त्‍या पानावर तिला तिच्‍या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. त्‍यामुळे तिचा साधनेतील उत्‍साह वाढतो. ती हा ग्रंथ सतत स्‍वतःजवळ ठेवते. ‘हा ग्रंथ म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरच आहेत’, असा तिचा भाव असतो.

६. कु. वैदेही हिच्‍यातील स्‍वभावदोष स्‍वतःच्‍या मनाप्रमाणे करणे आणि सवलत घेणे

‘हे गुरुराया, आपणच आम्‍हाला वैदेहीसारख्‍या दैवी बालिकेला सांभाळण्‍याची आणि घडवण्‍याच्‍या सेवेची संधी दिली. या सेवेतून आम्‍हीही घडत आहोत. ‘आम्‍हाला तिच्‍यासारख्‍या दैवी बालिकेचा सत्‍संग मिळत आहे’, याबद्दल आम्‍ही तुमच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. मनोज वसंत खाडये आणि सौ. मंजुषा मनोज खाडये (वैदेहीचे वडील आणि आई), कुडाळ, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (१४.१०.२०२३)