सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. ११.५.२०२३ या दिवशी ‘मी ब्रह्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम पहात असतांना माझा भाव सतत जागृत होत होता.
२. मला गुरुदेवांचे दर्शन झाले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. ते सततच येत होते.
३. संपूर्ण कार्यक्रम पहात असतांना ‘मी वेगळ्याच विश्वामध्ये आहे’, असे मला वाटत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला त्यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आले. गुरुदेवा, यासाठी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दिगंबर काणेकर, माणगाव, कुडाळ, सिंधुदुर्ग. (१८.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |