भक्‍तीसत्‍संग ऐकल्‍यानंतर ‘गुरुदेवांप्रमाणे स्‍वतःची उंचीसुद्धा प्रत्‍येक कृती करत असतांना वाढत आहे’, असे साधिकेला जाणवणे

कु. महानंदा पाटील

‘गुरुवार, मार्गशीर्ष शुक्‍ल षष्‍ठी (९.१२.२०२१) या दिवशी दुपारी २.३० वाजता भक्‍तीसत्‍संग होता. त्‍या सत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची उंची अनेक वेळा वाढल्‍यासारखी वाटते.’ तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘साधारणतः ६ ते ७ मासांपासून मी खोलीत असतांना, सकाळी उठल्‍यावर माझे अंथरुण-पांघरूण जुळवत असतांना, सकाळी सेवेसाठी खोलीतून बाहेर गेल्‍यावर, दुसर्‍या मजल्‍यावरील मार्गिकेतून सेवेसाठी जातांना आणि चालतांना मी उंच झाले आहे.’ त्‍या वेळी ‘मी अधांतरी चालत आहे’, असे मला वाटायचे. मला ‘माझे पाय जमिनीला टेकलेत कि नाही ?’ असे वाटायचे. ज्‍या ज्‍या वेळी स्‍वत: उंच झाल्‍यासारखी वाटायचे, त्‍या वेळी माझ्‍या मनात प.पू. डॉक्‍टरांचेच रूप असायचे.

वरील लिखाण प.पू. डॉक्‍टरांच्‍याच कृपेमुळे लिहू शकले. प.पू. डॉक्‍टर, तुमच्‍या चरणी मी कृतज्ञ आहे.’

प.पू. डॉक्‍टर, तुमच्‍या चरणी मी कृतज्ञ आहे.’

– रामाची दासी,

सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) , सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(२०.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक