ईश्वरप्राप्तीसंदर्भात मनुष्याची लाजिरवाणी उदासीनता !

‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्‍वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कोणी विचारही करत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘सत्सेवा’ या विषयावर केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘नाम, सत्संग आणि सत्सेवा…’, असे साधनेचे टप्पे आहेत. सेवा ही पुढची पायरी आहे. नवीन साधकांना ‘नामजप करा’, असे सांगितले जाते. समष्टी सेवा केल्याने कितीतरी अधिक पटींनी लाभ होतात

आपत्‍काळातून तरून जाण्‍यासाठी साधना वाढवून ईश्‍वराचे निस्‍सीम भक्‍त बना !

‘आजच्‍या निधर्मी (अधर्मी) राज्‍यप्रणालीमुळे सध्‍याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्‍यामुळे राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍यावर अनेक संकटे ओढवली आहेत. जगभरात अनाचार आणि अनैतिकता वाढीस लागली आहे, तसेच विविध नैसर्गिक आपत्ती, युद्धसदृश स्‍थिती यांमध्‍येही वाढ होत आहे.

अपघातग्रस्‍तांकडे दुर्लक्ष न करता त्‍यांना त्‍वरित साहाय्‍य करा !

‘अपघातानंतर अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य करण्‍यास सहसा कुणी धजावत नाही. अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य केल्‍यास पुढे साक्ष, पुरावा आदींसाठी पोलीस ठाण्‍यात हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास टाळण्‍यासाठी बरेच जण इच्‍छा असूनही अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य करत नाहीत; मात्र ‘अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य न करणे’ योग्‍य नाही.

स्वार्थी मनुष्य !

‘भूतलावर सर्व प्राणी दुसर्‍यांसाठी जगतात. प्राणी, वनस्पती हे इतरांना काही ना काही देत असतात. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की, जो केवळ स्वतःसाठी जगत असतो. तो निसर्ग, प्राणी आणि वनस्पती यांच्याकडून सतत घेतच असतो. मनुष्याच्या या स्वार्थामुळेच तो इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त दुःखी असतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रुग्‍णाईत असूनही सतत सकारात्‍मक रहाणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणारे अकोला येथील (कै.) मधुकर काशीराम रेवेकर (वय ६४ वर्षे)!

बाबा शुद्धीवर आले आणि म्‍हणाले, ‘‘आईला कळवू नका. मी आता बरा आहे. गुरुमाऊली सतत माझ्‍या समवेत आहेत.’’ असे बर्‍याच प्रसंगांत बाबा नेहमी सकारात्‍मक रहायचे.   

‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसंदर्भात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर अन् त्‍याविषयी श्री. राम होनप यांची झालेली विचारप्रक्रिया

‘भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना व्‍हायला हवी; परंतु त्‍या दृष्‍टीने आपली सिद्धता अल्‍प आहे. ‘आपल्‍याकडे आवश्‍यक असलेले सात्त्विक लोकांचे संख्‍याबळ नाही, पैसा नाही आणि धर्माच्‍या प्रसारासाठीचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान नाही’, अशा परिस्‍थितीत हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना कशी होईल ?’’

साधकाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिरासाठी जायचे असतांना आणि शिबिरात सहभागी झाल्‍यावर आलेल्‍या अनुभूती

मी प्रार्थना करण्‍यासाठी डोळे बंद केल्‍यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व शिबिरार्थी आसंदीवर न बसता आकाशात बसले आहेत आणि समोरून पांढरे अन् फिकट लाल या रंगांचे ढग जात आहेत.

ʻईश्वर आहेʼ याचे ज्ञान नसलेल्या विज्ञानाची मर्यादा !

‘आजकाल आपण ज्याला ‘विज्ञान’, म्हणजे ‘विशेष ज्ञान’ म्हणतो, ते ‘विगतं ज्ञानं यस्मात्।’, म्हणजेच ‘ज्यातून ज्ञान निघून गेले आहे ते, झाले आहे.’ विज्ञानाला ‘ईश्‍वर आहे. ईश्‍वर निर्गुण निराकार आहे आणि त्याची व्याप्ती अनंत कोटी ब्रह्मांडांइतकी आहेʼ, हेही ज्ञात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पतीचे १०० टक्‍के आज्ञापालन करून साधनेत पतीच्‍या समवेत संतपद प्राप्‍त करणार्‍या कतरास, झारखंड येथील सनातनच्‍या ८४ व्‍या संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६२ वर्षे) !

आपले स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून होतील, तेव्‍हा गुण आपोआप वाढतील. अहं अल्‍प झाला, तर भाव आपोआप वाढेल.तेव्‍हा गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक एक चरण पूर्ण करत आपण सर्व जण निश्‍चित पुढे जाऊ.’