श्री गुरु तारिती सार्‍यातूनी ।

‘श्री गुरूंनी ज्याला कृपाछत्राखाली घेतले, त्याच्या सर्व संकटांचे हरण श्रीगुरुच करतात. आईने बाळासाठी धाव घ्यावी, तसे गुरु भक्तासाठी धावून येतात. मग ‘भक्ताने चिंता का करावी ?’, हे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती वसुधा देशपांडे (वय ७० वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

साधारण दीड वर्षापासून नामजप करायला लागल्यानंतर तंबोर्‍याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येतो आणि कंप होतो. त्यामुळे मला त्रास न होता आनंद होतो.

शासनकर्त्यांनी साधना न शिकवता सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !

राज्यकर्त्यांनी जनतेला साधनेऐवजी ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मनी तुमच्या ठेवा हा भाव ।

‘एका साधकाला त्याच्या चुका सांगितल्यावर त्याच्या मनात काही क्षण विकल्प निर्माण झाले. तेव्हा त्याला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

गायीला ‘माता’ मानणाऱ्या हिंदूंसाठी हे लज्जास्पद !

‘कुठे एका गायीच्या रक्षणासाठी प्राणांचाही त्याग करणारे हिंदूंचे पूर्वज, तर कुठे लाखो गायींना कत्तलखान्यात पाठवणारे आजचे हिंदू !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कलियुगात समष्टी साधना करण्याचे महत्त्व !

‘कलियुगापूर्वीच्या युगांतील राजे जनतेचे रक्षण करायचे; म्हणून प्रजा व्यष्टी साधना करायची. आताचे, विशेषतः स्वातंत्र्यानंतरचे शासनकर्ते जनतेचे रक्षण करत नसल्याने सर्वांनी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी मनाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न करा !

साधनेच्या प्राथमिक टप्प्याला साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. त्यामुळे या टप्प्यावर साधनेसाठी बुद्धीचे महत्त्व ७० टक्के आणि मनाचे महत्त्व ३० टक्के असते.

‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्‍चय प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक !

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या. त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा मनाचा निश्‍चय करून त्यासाठी प्रत्येक हिंदूने लढाऊ वृत्तीने आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंना साधना शिकवणे अपरिहार्य !

‘जगातील सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात जन्म मिळूनही धर्मासाठी काहीच न करणारे हिंदू मरणाच्याच लायकीचे आहेत किंवा जगण्याच्या लायकीचे नाहीत’, असे काही जणांना वाटते; पण ते योग्य नाही. ‘त्यांना साधना शिकवणे’, हे हिंदूंचे कर्तव्य आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधकाची प्रकृती अंतर्ज्ञानाने अचूक ओळखून त्यानुरूप त्याला मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कुठलेही वाक्य उगाचच नसते. त्यामागे काहीतरी कारण असते’, हे या प्रसंगावरून माझ्या लक्षात आले.