‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसंदर्भात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर अन् त्‍याविषयी श्री. राम होनप यांची झालेली विचारप्रक्रिया

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. राम होनप

‘एकदा एका धर्मप्रेमीने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना पुढील प्रश्‍न विचारला, ‘‘भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना व्‍हायला हवी; परंतु त्‍या दृष्‍टीने आपली सिद्धता अल्‍प आहे. ‘आपल्‍याकडे आवश्‍यक असलेले सात्त्विक लोकांचे संख्‍याबळ नाही, पैसा नाही आणि धर्माच्‍या प्रसारासाठीचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान नाही’, अशा परिस्‍थितीत हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना कशी होईल ?’’ त्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘आपल्‍या बाजूने भगवान श्रीकृष्‍ण आहे. त्‍यामुळे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होईल.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे इतके सुंदर आणि एका वाक्‍यातील उत्तर ऐकून माझा भाव जागृत झाला. या प्रसंगातून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची श्रीकृष्‍णावरील ‘पूर्ण श्रद्धा आणि भक्‍ती’ दिसून येते. या प्रसंगी माझ्‍या मनात पुढील विचार आले, ‘महाभारतातील युद्धात दुर्योधनाकडे अफाट सैन्‍य होते आणि पांडवांच्‍या बाजूने केवळ भगवान श्रीकृष्‍ण होता. श्रीकृष्‍ण ‘पूर्णावतार’ आणि ‘सर्वशक्‍तीमान’ असल्‍याने त्‍याच्‍या कृपेमुळे पांडव युद्धात जिंकले, तसेच हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेबाबत आताही घडणार आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२३)