‘अपघातानंतर अपघातग्रस्तांना साहाय्य करण्यास सहसा कुणी धजावत नाही. अपघातग्रस्तांना साहाय्य केल्यास पुढे साक्ष, पुरावा आदींसाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास टाळण्यासाठी बरेच जण इच्छा असूनही अपघातग्रस्तांना साहाय्य करत नाहीत; मात्र ‘अपघातग्रस्तांना साहाय्य न करणे’ योग्य नाही. अपघात झालेला पाहून नागरिकांनी त्वरित पोलिसांना ‘१००’ या क्रमांकावर दूरभाष / भ्रमणभाष करून अपघातस्थळ आणि अपघाताचे गांभीर्य यांविषयी माहिती द्यावी. स्वत:कडे चारचाकी वाहन असल्यास अपघातग्रस्तांना रुग्णालयात भरती करावे. असे करणे शक्य नसल्यास रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनधारकांकडे साहाय्य मागावे किंवा पोलिसांना रुग्णवाहिका पाठवण्यासाठी सांगावे. ‘आपण अपघातग्रस्त असतो, तर साहाय्याची अपेक्षा केली असती’, हे लक्षात घेऊन, तसेच माणुसकी दाखवून अपघातग्रस्तांना साहाय्य करावे. अपघातग्रस्तांना त्वरित साहाय्य मिळवून देणे सुलभ व्हावे, यासाठी पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्नीशमन दल यांचे दूरभाष क्रमांक स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये नोंदवून ठेवावेत.’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले