व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची तीव्र तळमळ अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मधुमालती नाईक (वय ८३ वर्षे) !
वर्ष १९९५ पासून श्रीमती मधुमालती नाईक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांच्या प्रथम आवृत्तीपासूनच त्यांचे वितरण करणे, प्रदर्शन कक्ष लावणे’, अशा सेवांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत.