पैंगीण निवासी दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांना ‘वेदांतरत्न’ उपाधी प्राप्त !

येथील टेंग्से कुलोत्पन्न तर्करत्न श्री. दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची ‘तेनाली’ येथे महापरीक्षा देऊन २७ ऑक्टोबर या दिवशी ‘वेदांतरत्न’ ही उपाधी कांची पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याकडून प्राप्त केली.

वसुबारसच्या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी तिलारी घाटात गोमांसाची अवैध वाहतूक रोखली !

जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ?

२ जणांना पैसे घेऊन नोकर्‍या देण्यात गोवा सचिवालयातील २ शासकीय अधिकार्‍यांचा सहभाग! – मुख्यमंत्री

पूजा सावंत यांनी सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याचे प्रकरण

गोव्यातील दिवाळी सणाला वेगळे स्वरूप देणे आवश्यक ! – सुदिन ढवळीकर

हल्ली दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहनाच्या दिवशी अनेक गोष्टी घडतांना दिसतात. दीपावलीच्या पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. आजची मुले दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुराची प्रतिमा घेऊन रात्री उशिरापर्यंत नाचत असल्याने ती अभ्यंगस्नानाला मुकतात.

म्हादई अभयारण्यात वाघीण आणि तिचे ३ बछडे यांचे अस्तित्व ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादई वन्यजीव अभयारण्यात वाघीण आणि तिचे ३ बछडे ‘नाईट व्हिजन कॅमेर्‍यां’मध्ये चित्रित झालेल्या चित्रीकरणात दिसत असल्याची माहिती प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.

हणजूण-वागातोर येथील कोमुनिदादची भूमी ‘सनबर्न’सारख्या कुठल्याही संगीत रजनी कार्यक्रमाला देऊ नका !

कुचेली येथे संगीत रजनी कार्यक्रमाला यापूर्वी विरोध झाला आहे. आता हणजूण-वागातोर येथील कोमुनिदादची भूमी ‘सनबर्न’सारख्या कुठल्याही संगीत रजनी कार्यक्रमाला देण्यात येऊ नये, अशी मागणी हणजूणवासियांनी २७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी हणजूण येथील सेंट मायकल चर्चच्या परिसरात आंदोलन करून केली.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियान

गोव्यात आस्थापनांचे व्यवस्थापन, वैयक्तिक गाठीभेटी, फलक लावणे आदींद्वारे अभियानाविषयी व्यापक जागृती

कळसा प्रकल्पाच्या संयुक्त पहाणीसाठी म्हादई प्रवाह प्राधिकरण केंद्राकडून कायदेशीर सल्ला घेणार : बैठकीत निर्णय

कळसा प्रकल्पाची संयुक्त पहाणी करण्यासाठी केंद्राकडून कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय ‘म्हादई प्रवाह’च्या २५ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या तिसर्‍या बैठकीत घेण्यात आला.

पर्यटन खात्याचा गोव्यातील मंदिर संस्कृती आणि आध्यात्मिक महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न !

पर्यटन खाते गोव्यातील धार्मिक स्थळांकडे देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी खाते ‘एकादश तीर्थ सर्किट’ ही योजना राबवत आहे.

बाल न्यायालयाने दोषीला २० वर्षांचा कारावास आणि साडेनऊ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

३० ऑक्टोबर २०१५ या दिवशी आशेवाडा, बेतोडा येथे ही घटना घडली होती आणि त्या वेळी संशयिताचे वय १९ वर्षे होते.