इस्लामी राष्ट्रवादी नेत्यांना ओळखा !

काही जण छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केले.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

५० किंवा १०० वर्षांनी एखादा मुसलमान शासनकर्ता भारतात असू शकेल. त्या वेळी इतिहासाच्या आधारे राममंदिर तोडून मशीद पुन्हा बांधली जाऊ शकते, असे विधान ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केले आहे.

हिंदुद्वेषी काँग्रेसला भीक घालू नका !

काँग्रेस अल्पसंख्यांकांसह हिंदूंनाही पक्षासमवेत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंची आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाईमध्ये बहुसंख्य समाजालाही घेतले पाहिजे, असे फुकाचे विधान काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांनी केले.

आतंकवाद्यांना धर्म असतो !

जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्‍या मुसलमानांना तेथे रहाणार्‍या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेसने केलेला श्रीरामाचा अवमान जाणा !

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भगवान श्रीरामाशी तुलना केली, तर काँग्रेसजनांना ‘भरत’ असे संबोधले.

धर्मांतरविरोधी कायदा कधी करणार ?

आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या धर्मप्रचारकांना रायगडमधील अलीबाग तालुक्यातील कुसुंबळे आदिवासी पाड्यामधील युवकांनी पिटाळून लावले. ही घटना २५ डिसेंबरला नाताळच्या दिवशी घडली.

पाद्री किंवा मौलवी यांना अशा धमक्या मिळत नाहीत !

‘ओवैसी आणि मुसलमान यांच्या विरुद्ध बोलल्यास तुम्हाला बाँबने उडवून देऊ’, अशी धमकी प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांना मिळाली आहे. ‘दिनेश’ असे नाव सांगून दुबई येथून ही धमकी देण्यात आली.

आतंकवादाला धर्म असतो !

जॉर्डन या इस्लामी देशातील ‘रॅबिट’ या संस्थेने घोषित केलेल्या जगातील ५०० प्रभावशाली मुसलमान व्यक्तींच्या सूचीमध्ये जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक याचाही समावेश आहे.

देशाची अपकीर्ती करणार्‍यांनी देशात राहूच नये !

भारत हा मुसलमानांनी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्‍या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांनी केले आहे.

सरकारी शाळेत हिंदूंना धर्मशिक्षण द्या !

बरेलीच्या कमला नेहरू पूर्व माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून ‘मेरे अल्ला’ ही मदरशांतील प्रार्थना म्हणून घेण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाल्यावर शाळेचे मुख्याध्यापक नाहिद सिद्दीकी यांना निलंबित करण्यात आले आहे.