पाकमधील हिंदूंवरील अन्याय जाणा !

पाकमधील हिंदूंवरील अन्याय जाणा !

पाकमध्ये एका मदरशाच्या पुस्तकालयामध्ये लघवी केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ८ वर्षांच्या हिंदु मुलाला ईशनिंदा कायद्याद्वारे फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माकपची राष्ट्रघातकी वृत्ती जाणा !

माकपची राष्ट्रघातकी वृत्ती जाणा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकपच्या) मुख्यालयात आणि विविध कार्यालयांमध्ये येत्या १५ ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्यात येणार आहे.

या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! 

या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! 

बांगलादेशातील शियाली गावात शेकडो धर्मांधांनी  ७ ऑगस्टच्या दुपारी हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण करत तेथे नासधूस केली. यामध्ये ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांचा समावेश आहे.

हज हाऊसचा प्रस्ताव रहित करा !

हज हाऊसचा प्रस्ताव रहित करा !

देहलीतील द्वारका भागातील आम आदमी पक्षाच्या सरकारकडून हज हाऊससाठी ७ सहस्र चौरस मीटर भूमी देण्यात आली आहे. तसेच सरकार त्याच्यावर १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याला विरोध केला आहे.

भारतात असे होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारतात असे होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पोलंडच्या वॉर्सा विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्लोक लिहिण्यात आले आहेत. याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

पाकमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

पाकमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य धर्मांधांकडून फोडण्यात आले.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

मुरादाबाद येथील शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी ‘घरे विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांध मांसाहार करून त्याचे अवशेष संकुलात रहाणार्‍या हिंदूंच्या घरासमोर फेकतात, असा हिंदूंनी आरोप केला आहे.

साम्यवादी पक्षांवर बंदी घाला !

साम्यवादी पक्षांवर बंदी घाला !

भारत आणि अमेरिका यांच्यात वर्ष २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणू करार रोखण्यासाठी चीनने भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते, असा दावा सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे.

प्रशासन झोपलेले आहे का ?

प्रशासन झोपलेले आहे का ?

नवी देहली येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.

साम्यवादी सरकारने असा सल्ला ईदच्या वेळी का दिला नाही ? 

साम्यवादी सरकारने असा सल्ला ईदच्या वेळी का दिला नाही ? 

ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका, कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शक्य असल्यास नातेवाइकांना भेटणे टाळा, असा फुकाचा सल्ला केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी हिंदूंना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.