गांधीवादी काँग्रेसवाल्यांचा हिंसाचार जाणा !
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या विधानानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्या देहलीतील निवासस्थानाची तोडफोड केली.
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या विधानानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्या देहलीतील निवासस्थानाची तोडफोड केली.
नेपाळला लागून असलेल्या भारताच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या अडीच पटींनी वाढली आहे. तेथे केवळ २ वर्षांत ४०० हून अधिक मदरसे आणि मशिदी यांची निर्मिती करण्यात आली आहे, असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे.
बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे.
उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने धर्मांतराच्या प्रकरणात डॉ. आतिफ याला अटक केली आहे. आतिफ हा ‘कुणाल चौधरी’ या नावाने नाशिकमध्ये रहात होता. त्याच्या खात्यात विविध देशांतून तब्बल २० कोटी रुपये जमा झाले आहेत.
कृषी कायद्यांच्या विरोधात ४० शेतकरी संघटनांनी २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. काँग्रेस, बसप या राजकीय पक्षांसह बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ येथील सरकारांनी बंदला समर्थन दिले आहे.
महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर साधू-संतांच्या हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. एकट्या हरिद्वार येथे मागील ३ दशकांमध्ये २९ संतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे, तर ३ संत बेपत्ता झाले आहेत.
रोम (इटली) येथील पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी याने चर्चचे ८६ लाख रुपये चोरून या पैशांतून स्वतःच्या घरी समलैंगिक संबंध ठेवणार्यांची ‘लैंगिक संबंधांची मेजवानी’ (सेक्स पार्टी) आयोजित केली होती. यासाठी त्याने अमली पदार्थही विकत घेतले होते.
रायसेन (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत ८ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी पवन सेन कपाळावर टिळा लावून शाळेत येत असल्याने त्याला धर्मांध शिक्षिका निशात बेगम हिने बाहेरील लोकांना सांगून अमानुष मारहाण करायला लावल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.
‘मुसलमानांमध्ये प्रति महिला प्रजनन दर वर्ष २०१५ मध्ये २.६ इतका होता. हा प्रजनन दर भारतातील धार्मिक समूहांमध्ये सर्वाधिकच आहे’, असे अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रसिद्ध आस्थापन ‘मान्यवर’ने विज्ञापनात हिंदूंच्या ‘कन्यादान’ या विधीला ‘प्रतिगामी’ ठरवण्यात आले असून त्याऐवजी ‘कन्यामान’ हा शब्द सुचवण्यात आला आहे.