अशांना फाशीचीच शिक्षा हवी !
गुरुग्राम (हरियाणा) येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणाऱ्या ६ गोतस्करांना अटक केली.
गुरुग्राम (हरियाणा) येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणाऱ्या ६ गोतस्करांना अटक केली.
कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जर सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल, असे आश्वासन फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या महिला उमेदवार मरीन ली पेन यांनी दिले आहे.
मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा लेखी आदेश दिला. यावर काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी आक्षेप घेत ‘अशा आदेशामुळे चुकीचा प्रघात पडेल’, असे म्हटले आहे.
हलाल मांस इस्लामेतर लोकांसाठी नाही; म्हणजे जे इस्लामचे अनुयायी नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबूकवर पोस्ट करून केली आहे.
कर्नाटक सरकारने ‘कोणत्याही पशूची हत्या करतांना त्याला बेशुद्ध करणे आवश्यक आहे’, असा आदेश दिला आहे. हलाल मांसाच्या वेळी प्राण्यांची गळ्याकडील नस कापून रक्तस्राव होऊन त्याची हत्या केली जाते. अशा हत्यांवर या आदेशामुळे बंदी येणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी करौली (राजस्थान) येथे हिंदूंकडून काढण्यात आलेली दुचाकी फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात ३५ जण घायाळ झाले.
कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या मुसलमान आमदारांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली.
कर्नाटकातील इराण्णा नागूर यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारांसाठी तमिळनाडूच्या वेल्लोर येथील ख्रिस्ती मिशनरी रुग्णालयात माहिती विचारली असता तेथे त्यांना मुलावर विनामूल्य उपचारांसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले.
‘गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ‘होसतोडकू’ या सणाच्या वेळी हलाल मांसाच्या ऐवजी झटका मांसाचा उपयोग करावा’, असे आवाहन कर्नाटकातील समस्त हिंदु संघटनांच्या संघाने केले आहे.