‘हिंडेनबर्ग रिसर्च’ लवकरच नवा अहवाल सादर करणार !

‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्वीट करण्यात आले आहे. ‘नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा’, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांच्या जवळचे असणारे हर्ष मंदेर यांच्या संस्थेची सीबीआय चौकशी होणार

तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.

राज्‍य सरकारी कर्मचार्‍यांच्‍या मागणीविषयी उचित निर्णय घेणार ! – मुख्‍यमंत्री  

कर्मचार्‍यांच्‍या मागणीविषयी राज्‍यशासन पूर्णतः सकारात्‍मक असून यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्‍त करून त्‍यावर उचित निर्णय घेण्‍यात येईल.

केंद्रशासन देशातील १ लाख कोटी रुपयांच्या ‘शत्रूच्या संपत्ती’ची विक्री करणार !

आतापर्यंत केंद्रशासनाने  अशा प्रकारच्या मालमत्तांच्या लिलावातून ३ सहस्र ४०० कोटी रुपये मिळवले आहेत.

धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात चोरांकडून  ४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

चोरीमध्ये साधारणतः ४ लाख ८७ सहस्र रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. कार्यक्रमाला १ लाखाहून अधिक भाविक उपस्थित होते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

रुग्णालयातील सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासन रोजंदारीवर कर्मचारी घेणार !

राज्यात ठिकठिकाणी आधुनिक वैद्य, परिचारिका, तसेच आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने रुग्ण सेवेत अडथळे येत आहेत. शस्त्रक्रिया रखडलेल्या असून रुग्णांवर उपचार करतांनाही सरकारी रुग्णालयातील व्यवस्था तोकडी पडू लागली आहे.

प्रशासकांनी (आयुक्त) अर्थसंकल्पाचा निधी किरकोळ कामांसाठी इतरत्र वळवल्याचे उघडकीस !

स्थानिक स्वरूपातील ठराविक कामांसाठी नगरसेवक अर्थसंकल्पातील तरतुदींचे वर्गीकरण करत असल्याने निधीचा विनियोग होत नाही, अशी तक्रार करणार्‍या अधिकार्‍यांनी अनेक क्षुल्लक कामांसाठी वर्गीकरण करून निधी वळवला आहे.

१ लाख रुपयांवरील थकीत पाणीदेयकाच्या रकमेवरील विलंब शुल्कात २५ टक्के सवलत !

नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीदेयकाची १ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची थकबाकी असणार्‍या ग्राहकांना लोक अदालतीमध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.

पुणे येथील व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

खासगी वित्तीय संस्थेची शाखा चालू करण्याचे आमीष दाखवून येथील व्यावसायिकाची १ कोटी ३४ लाख ५४ सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी याकूब अली ख्वाजा अहमद उपाख्य याका याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

प्रशासकीय उधळपट्टी थांबवण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संघटित कृती करणे अपरिहार्य !

आज नोकरीत जे ७० सहस्रांहून अधिक वेतन घेतात, त्यांनी त्यागाची सिद्धता दर्शवली पाहिजे. ‘आमचे हक्क सुरक्षित ठेवा आणि तरीही नोकरभरती करा’, ‘कंत्राटी कर्मचारी नेमू नका’, ‘सर्वांना निवृत्तीवेतन द्या’, असा कोरडा पाठिंबा देण्यात अर्थ नाही. तुम्ही या मुलांसाठी त्याग करणार का ? हा खरा प्रश्न आहे.