खासगी वित्तीय संस्थेची शाखा चालू करण्याच्या निमित्ताने
पुणे – खासगी वित्तीय संस्थेची शाखा चालू करण्याचे आमीष दाखवून येथील व्यावसायिकाची १ कोटी ३४ लाख ५४ सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी याकूब अली ख्वाजा अहमद उपाख्य याका याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी व्यावसायिकाने तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपीने ‘झायसोल इंटिग्रेटेड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ हे खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय पुणे येथे चालू करायचे असून यासाठी कार्यालयाला जागा हवी आहे. संस्थेकडून कर्ज पुरवठा होऊन या व्यवसायात मोठा नफा मिळतो, असे आमीष दाखवले. व्यावसायिकाने १ कोटी ३४ लाख ५४ सहस्र रुपये दिले; मात्र परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली.