54th iffi 2023 GOA Conclusion : ‘एंडलेस बॉर्डर्स’ चित्रपटाला यंदाचा सुवर्ण मयूर पुरस्कार !

यंदा आंचिममध्ये जगभरातील ७ सहस्र प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच महोत्सवात ७८ देशांतील २७० चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. ‘हॉलिवूड चित्रपट निर्माते मायकल डग्लस यांनी त्यांचा पुढचा चित्रपट गोव्यात करावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Mhadei Water Dispute : म्हादई प्रकरणातील खटले गोवा जिंकणार ! – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

ज्या पद्धतीने खटले प्रविष्ट झाले आहेत, त्यावरून गोवा हे खटले जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हादई प्रकरणी आम्ही गंभीर आणि भक्कम आहोत’, असेही ते म्हणाले.

Anti-Drone System : तुये (गोवा) येथे ‘काउंटर-ड्रोन’ कारखाना येणार

काउंटर-ड्रोन म्हणजे ड्रोनविरोधी यंत्रणा : गोव्यातील तरुण या ठिकाणी नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. हे आस्थापन उत्पादनाची निर्यातही करते. २ वर्षांच्या कालावधीत येथे प्रत्यक्ष उत्पादनही चालू होणार आहे.

Goa Mining Issue : खाण क्षेत्रांच्या लिलाव प्रक्रियेला गती द्या ! – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सर्व ८६ खाण क्षेत्रांचा ३ मासांच्या आत लिलाव केला जाणार असल्याचे सरकारने जानेवारी मासात घोषित केले होते; मात्र आतापर्यंत केवळ ९ खाण क्षेत्रांचा लिलाव झालेला आहे. ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालू आहे.

Tamnar Power Project : तमनार वीज प्रकल्पाला गोवा राज्य वन्य प्राणी मंडळाची संमती

हा प्रकल्प झाल्यानंतर गोव्याला १ सहस्र २०० मेगावॅट वीज मिळणार आहे. तमनार येथून येणारी ४०० केव्ही क्षमतेची वीजवाहिनी धारवाड, कर्नाटक येथील नरेंद्र पॉवर ग्रीडपासून चालू होऊन गोव्यातील शेल्डेपर्यंत येणार आहे.

54th iffi 2023 Opening Ceremony : चित्रपट निर्मितीमध्ये प्रमुख स्थान बनण्याच्या दृष्टीने गोव्याची वाटचाल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

वर्ष २००४ पासून गोवा राज्य या महोत्सवाचे यजमानपद भूषवत आहे. इथे लवकरच चित्रपट नगरी उभी रहाणार आहे. पुढील २ ते ३ वर्षांत हे काम पूर्णत्वास जाईल !

Goa Politics : नीलेश काब्राल यांचे मंत्रीपदाचे त्यागपत्र

मंत्री नीलेश काब्राल यांना मी वैयक्तिक स्तरावर मंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन आणि पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र राज्यपालांकडे सुपुर्द केले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

National Press Day – पत्रकारांनी जनहिताच्या दृष्टीने अशासकीय संस्थांवरही लिहावे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘पत्रकारांनी सरकारच्या चुका दाखवाव्यात. दाखवलेल्या चुका सुधारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते.’’ कार्यक्रमाच्या प्रारंभी गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी पत्रकारांपुढील समस्यांचे कथन केले.

54th IFFI 2023 : चित्रपट नगरीसाठी गोवा मनोरंजन संस्था भूमी ‘लिज’वर घेणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आंचिम) होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा मनोरंजन संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

Portuguese Looted Goa : पोर्तुगिजांनी गोव्याला लुटले, तर कदंबची राजवट हा सुवर्णकाळ होता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पोर्तुगीज राजवटीच्या पलीकडेही प्राचीन गोमंतकाला इतिहास आहे. आपण तो पहाणे आणि पुढच्या पिढीला शिकवणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांनी गोव्यावर आक्रमण करून सत्ता उपभोगली; मात्र ही सत्ता केवळ गोमंतकियांना लुटण्यासाठीच होती.