नैताळे (जिल्हा नाशिक) येथे लाच मागणार्‍या ग्रामसेवकांसह दोघांना अटक !

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रोत्सव समारोपाच्या पूर्वसंध्येला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० जानेवारी या दिवशी ७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना ग्रामसेवकासह दोघांना रंगेहात पकडून अटक केली आहे.

दारू विक्रेत्‍याकडून ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरसेवकाला अटक !

परवानाधारक दारूच्‍या दुकानाच्‍या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्‍यासाठी ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरपंचायत नगरसेवक अनिल उत्तमराव गेडाम यवतमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

बोगस खतनिर्मिती करणार्‍या आस्‍थापनांना कृषी यंत्रणा पाठीशी घालत आहे !

कृषी आयुक्‍तालय येथे २६ जानेवारीला आंदोलन करण्‍याची ‘प्रहार जनशक्‍ती संघटने’ची चेतावणी !

राजस्थानमधील लाचखोरीच्या प्रकरणी अटक केलेल्या महिला पोलीस अधीक्षकाच्या ठिकाणांवर धाडी !

भारतातील भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रामाणिक शासनकर्ते हवेत !

कारागृहांतील ‘नेटवर्क’ !

आज रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांची लूट केली जाते, अधिवक्‍ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्‍या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्‍यायला हवे ! त्‍यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्‍यांवर तसे संस्‍कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्‍ही नीतीमान होतील !

इराणकडून त्याच्याच माजी उप संरक्षणमंत्र्यांना फाशी

स्वतःच्या माजी उप संरक्षणमंत्र्याला हेरगिरीच्या प्रकरणी फाशी देणार्‍या इराणकडून भारताने बोध घेणे आवश्यक !

पुणे येथील जिल्हा उद्योग केंद्रातील निरीक्षकास लाच घेतांना अटक !

‘पंतप्रधान रोजगार हमी योजने’अंतर्गत कर्ज संमत करण्यासाठी एका तरुणाकडून साडेतीन सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा उद्योग केंद्रातील निरीक्षक चंद्रभान गोहाड याला अटक करण्यात आली आहे.

लाच घेणार्‍यांची पाठराखण का ?

देशातील भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपली मानसिकता पालटून ‘लाच घेणारा व्‍यक्‍ती आणि त्‍याचे कुटुंबीय यांनाच त्रास होईल’, असा विचार केल्‍यास प्रत्‍येक व्‍यक्‍ती कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने लाच घेण्‍यापासून लांब राहील, हे नक्‍की !

पिंपरी (पुणे) येथील २ अनुदानित शाळांमध्ये अवघे ३-४ विद्यार्थी !

शहरातील ‘ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालय, किवळे’ आणि ‘कमला नेहरू प्राथमिक विद्यालय, चिंचवड स्टेशन’ या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये अवघी ३-४ विद्यार्थी संख्या आहे; मात्र प्रतिवर्षी बोगस पटसंख्या दाखवून शासनाकडून मिळालेले अनुदान घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेतील निवृत्तीवेतन घोटाळ्याच्या व्याप्तीत वाढ

येथील जिल्हा परिषदेतील निवृत्तीवेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. प्रारंभी घोटाळा १ कोटी ८६ लाख रुपयांचा असल्याचा अंदाज वर्तवला होता; मात्र हा घोटाळा आता २ कोटी ७५ लाख रुपयांपर्यंत गेला आहे. याविषयीचा अहवाल पारशिवनी पंचायत समितीने पोलिसांना सादर केल्याचे समजते.