झारखंड पोलिसांच्या हातमिळवणीतून होते बांगलादेशमध्ये गोवंशांची तस्करी ! – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप

याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात तस्करी रोखावी, असेच हिंदूंना वाटते !

गृहमंत्र्यांचा चौकशीचा आदेश; मात्र विधी आणि न्याय विभागाकडून ‘क्लीनचीट’ !

असे दिशाभूल करणारे आणि विरोधाभासी उत्तर देणार्‍या विधी आणि न्याय विभागातील उत्तरदायींचीही चौकाशी व्हायला हवी !

प्रशासकीय अधिकार्‍यांनी ठरवल्यास ते भ्रष्टाचार थांबवू शकतात ! – महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी

देशाच्या सध्याच्या यंत्रणेतील भ्रष्टाचाराची निर्मिती ही राजकीयपेक्षा प्रशासकीय यंत्रणेतूनच होत असून या यंत्रणेवर प्रभावी अंकुश ठेवण्यात सर्वच घटकांना अपयश येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील ‘वॉटर प्युरिफायर’ खरेदी घोटाळ्याचा एका मासात निर्णय

या प्रकरणात संपूर्ण समितीचीच चौकशी करण्याची आवश्यकता असून विभागीय आयुक्तांद्वारे एका मासात चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 

श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार !

प्रभादेवी (मुंबई) येथील ‘श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासा’त शिवभोजन थाळी, मंदिरांचे नूतनीकरण, ‘क्यू.आर्. कोड’ यंत्रणेसाठीच्या निविदा आणि प्रसादासाठी खरेदी करण्यात आलेले तूप, या प्रक्रियांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला.

बोगस नावाने रोजगार हमी योजनेचे पैसे लाटणार्‍या धाराशीव जिल्ह्यातील अपहाराचे पुनर्अन्वेषण होणार !

धाराशीव येथे खड्ड्यांच्या कामात बोगस नावे दाखवून पैसे लाटणार्‍या १ कोटी १२ लाख रुपयाच्या घोटाळ्याचे पुनर्अन्वेषण करण्याची घोषणा रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत केली. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी ३० डिसेंबर या दिवशी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्या !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर…

अनिल देशमुख यांची मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय संस्कृतीला काळीमा ! – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

भ्रष्टाचार्‍यांचे उदात्तीकरण करणार्‍या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची कठोर टीका

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी मुख्य सचिवांना लक्ष घालण्यास सांगणार !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही चौकशी बंद करणे, हा न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान आहे.

‘तुळजापूर फाइल्स’ !

आपल्या देशात सरकारी पातळीवर भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे की, तो सार्वजनिक जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. भ्रष्टाचार करण्याजोगी सर्व क्षेत्रे संपल्यानंतर राजकारण्यांनी त्यांचा मोर्चा हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्याकडे वळवला आहे.