इराणकडून त्याच्याच माजी उप संरक्षणमंत्र्यांना फाशी

हेरगिरीचा होता आरोप !

अली रझा अकबरी

तेहरान (इराण) – इराणने त्याचे माजी उप संरक्षणमंत्री अली रझा अकबरी (वय ६१ वर्षे) यांना हेरगिरीच्या आरोपातून फाशी दिली. अकबरी यांच्याकडे इराण समवेतच ब्रिटनचेही नागरिकत्व होते. अकबरी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावर विरोधही झाला होता; मात्र तरीही इराणने फाशी रहित केली नाही. ‘अकबरी यांनी भ्रष्टाचार आणि देशाची अंतर्गत आणि बाहेरील सुरक्षा यांना हानी पोचवली होती’, असा त्यांच्यावर आरोप होता.

अकबरी यांच्या फाशीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, हे एक अमानुष आणि भित्रेपणाचे कृत्य असून, ते एका राक्षसी शासनाद्वारे करण्यात आले आहे. या शासनाला लोकांच्या मानवाधिकारचा कोणताही सन्मान नाही.

संपादकीय भूमिका 

स्वतःच्या माजी उप संरक्षणमंत्र्याला हेरगिरीच्या प्रकरणी फाशी देणार्‍या इराणकडून भारताने बोध घेणे आवश्यक !