नम्र, इतरांना साहाय्य करणार्‍या आणि स्वतःमध्ये पालट करणार्‍या मथुरा सेवाकेंद्रातील सुश्री (कु.) प्रियंका सिंह !

‘वैशाख शुक्ल चतुर्दशी (२२.५.२०२४) या दिवशी मथुरा सेवाकेंद्रातील साधिका सुश्री (कु.) प्रियंका सिंह यांचा ४७ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मथुरा सेवाकेंद्रातील साधकांना सुश्री प्रियंका सिंह यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुण

साधनेचा कोणताही विषय वा धार्मिक कृती असो किंवा आचारधर्मातील कोणतीही गोष्ट असो, परात्पर गुरु डॉक्टरांनी आधी स्वतः कृती केली आहे. त्यानंतर त्यांनी त्याविषयी इतरांना सांगितले आहे.