१. साधिकेच्या पायाचा अस्थिभंग झाल्याने तिला दीड मास खोलीत रहावे लागल्यावर अस्वस्थता जाणवणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर काही वर्षांपासून आजारपणामुळे त्यांच्या खोलीतच आहेत’, हे लक्षात येऊन त्यांच्यातील ‘संयम’ या गुणाची जाणीव होणे
वर्ष २०२२ मध्ये माझ्या पायाचा अस्थिभंग झाला. त्या वेळी मला दीड मास खोलीतच रहावे लागले होते. शेवटच्या आठवड्यात ‘मी कधी खोलीतून बाहेर जाऊन सर्व साधकांना भेटते’, असे मला झाले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मला केवळ दीड मास खोलीतच रहावे लागले, तरीही मी इतकी अस्वस्थ झाले आहे. परात्पर गुरु डॉक्टर काही वर्षे आजारपणामुळे खोलीत आहेत, तरीही ते आनंदाने आणि उत्साहाने ग्रंथांची सेवा करतात.’ या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये ‘संयम आणि स्वीकारणे’ हे गुण किती अधिक प्रमाणात आहेत !’, हे माझ्या लक्षात आले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांमधे प्रीती असल्याने ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करत असणे
परात्पर गुरु डॉक्टर केवळ साधकांचा विचार करत नाहीत, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतात. परात्पर गुरु डॉक्टर साधकांवर निरपेक्ष प्रेम करतातच, तसेच प्राणीमात्रांवरही तेवढेच प्रेम करतात. त्यांच्या निरपेक्ष प्रीतीची प्रचीती देणारी सहस्रो उदाहरणे आहेत.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनिष्ट शक्तींच्या संदर्भातील संशोधन
परात्पर गुरु डॉक्टरांमधील संशोधक वृत्तीमुळे आज अनिष्ट शक्तींच्या संदर्भातील अनेक विषयांवर संशोधन झाले आहे, तसेच अनेक विषयांवर संशोधन करणे चालू आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांमधील गुण कमाल मर्यादेचे आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांमधील गुण त्यांच्यातील देवत्वाचा परिचय करून देतात.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले कुठल्याही विषयावर मार्गदर्शन करू शकणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शाळेत असल्यापासून समाजाला उपयुक्त अशा विषयांवर लिखाण केले आहे. नंतर ते साधनेत आल्यावर त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या लिखाणातून स्त्रियांच्या गर्भधारणेपासून ते मृत्यूनंतरच्या जिवाच्या प्रवासातील एकही विषय सुटलेला नाही. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्याशी संबंधित प्रत्येक विषय, तसेच सनातन आश्रमात स्वयंपाकघरातील चहा बनवण्यापासून, बांधकाम, कला किंवा ध्वनीचित्रीकरण यांच्याशी संबंधित कुठलीही सेवा असो किंवा ‘अध्यात्मप्रचार कसा करावा ?’, हा विषय असो, प्रत्येकच क्षेत्रात परात्पर गुरु डॉक्टरांनी अनमोल मार्गदर्शन केले आहे.
५. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार समष्टीला घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधनेचा कोणताही विषय वा धार्मिक कृती असो किंवा आचारधर्मातील कोणतीही गोष्ट असो, परात्पर गुरु डॉक्टरांनी आधी स्वतः कृती केली आहे. त्यानंतर त्यांनी त्याविषयी इतरांना सांगितले आहे. त्यांनी स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवले आहे. समोरच्या व्यक्तीला दिलेली वेळ पाळणे, आचारधर्मानुसार कृती करणे, सेवा परिपूर्ण करणे, वयस्कर किंवा रुग्णाईत साधकांची सेवा करणे आदी अनेक गोष्टी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःच्या आचरणातून साधकांना शिकवल्या आहेत.
६. ‘एखादा दुःखी साधक परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यावर आनंदी होत असणे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीय वैशिष्ट्य !
चेहर्यावर ताण आणि दुःखी भाव असलेला साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत गेल्यावर आनंदी होऊन बाहेर येतो. ही गोष्ट केवळ मी अनुभवली आहे, असे नसून ती सर्वच साधकांनी अनुभवलेली आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची ही कृपा असते’, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना नेहमी आनंदी रहाण्यास शिकवले आहे. सनातन संस्थेवर बंदी येण्याची शक्यता असलेला काळ असो किंवा कोरोना महामारीचा काळ असो, ‘साधक आहे ती परिस्थिती स्वीकारून आनंदी कसे रहाता येईल ?’, याकडे लक्ष देतात. ‘कितीही दुःखी असलेला साधक परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेला, की, तो आनंदी होऊनच येतो’, हे परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |