महर्षींच्‍या आज्ञेनुसार गुरुपौर्णिमेनिमित्त सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले औक्षण !

महर्षींच्‍या आज्ञेने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी, म्‍हणजेच ३ जुलै २०२३ या दिवशी पूजन आणि औक्षण केले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ब्रह्मोत्‍सवा’त काही साधक आणि संत यांच्‍या मनोगताच्‍या माध्‍यमातून साधकांना साधनेचा प्रायोगिक भाग शिकवणे

११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. त्‍या वेळी विविध जिल्‍ह्यांतून सहस्रो साधक आले होते. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधक आणि संत यांना मनोगत व्‍यक्‍त करण्‍यास सांगितले

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती !

ब्रह्मोत्‍सवाच्‍या आदल्‍या दिवशी परात्‍पर गुरुदेवांना आत्‍मनिवेदन करणे आणि ‘उद्या मी तुला काहीतरी देणार आहे, तू सिद्ध रहा !’, असे त्‍यांनी सूक्ष्मातून सांगणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ च्‍या प्रतिष्‍ठापनेपूर्वी पिंडिका सिद्ध करणे आणि तिचे रंगकाम करणे, या सेवांत आलेले अडथळे अन् आलेल्‍या अनुभूती

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार १४ आणि १५.७.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली. प्रतिष्‍ठापनेपूर्वीची सिद्धता करतांना आश्रमातील साधक श्री. रामानंद परब (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना सेवेत आलेले अडथळे आणि अनुभूती दिल्‍या आहेत.

सुनील केंद्रेकर यांनी जिल्‍हाधिकारी आस्‍तिक कुमार पांडेय यांच्‍याकडे दिला पदभार !

विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी स्‍वेच्‍छानिवृत्तीसाठी मासाभरापूर्वी केलेल्‍या अर्जाला अपर मुख्‍य सचिवांनी मान्‍यता दिली होती.