कन्हान (नागपूर) येथील हनुमान मंदिरातून पितळ्याच्या गदेची चोरी

जिल्ह्यातील कन्हान येथील हनुमान मंदिरातील पितळ्याची गदा एका युवकाने चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. चोरी करण्यापूर्वी युवकाने हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार केला, प्रसाद ग्रहण केला आणि नंतर गदा चोरली.

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवली ! – दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. १ सहस्र कोटी रुपयांचा निधी संमत झाला असून त्यांपैकी २७५ कोटी रुपये मिळाले आहेत.

अश्लील व्हिडिओद्वारे फसवणूक करत वृद्धाकडून १८ लाख रुपये लुटले !

पैशांच्या मागणीला प्रतिसाद न देता सायबर गुन्ह्यांविषयी सतर्कता बाळगा !

‘मध्यान्ह भोजन योजना’ बंद करण्यासाठी बीडमध्ये कामगारांचा भव्य मोर्चा !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यातील अडचणी का सोडवत नाही ?

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाची चेतावणी ! – स्वाभिमानी शेतकरी संघटना

राज्यातील शेतकर्‍यांचा विरोध झुगारून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन उभारण्याची चेतावणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे. कणेरी मठ येथील कार्यक्रमासाठी आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले.

जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली आहे ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

सध्या जागतिक आर्थिक घडी बिघडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे. यासह देशाला पर्यावरणात होणार्‍या पालटांचे परिणाम भोगावे लागतील.

निलंगा (लातूर) येथे दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात ९ ऑक्टोबर या दिवशी दिवसभरात दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहिल्या भूकंपाची तीव्रता २.१ रिश्टर स्केल इतकी होती, तर दुसर्‍या भूकंपाची तीव्रता १.९ रिश्टर स्केल इतकी होती

तुर्भे येथे ४ वीजचोरांकडून ६ लाख २९ सहस्र रुपयांची वसुली !

‘वीज’ या राष्ट्रीय संपत्तीची चोरी केल्याप्रकरणी केवळ दंडात्मक कारवाई नव्हे, तर अशांना कारागृहात टाकण्याची शिक्षा केली, तरच कारवाईचा धाक निर्माण होऊन असे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही !

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ६ लाख भाविकांनी घेतले श्री भवानीदेवीचे दर्शन !

सर्वाधिक भाविक सोलापूर येथून पायी चालत दर्शनासाठी आले होते. या मार्गावरील सर्व वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. ही वाहतूक बायपास मार्गे ५० किलोमीटर अंतरावरून वळवण्यात आली होती.

प्रभु श्रीरामाने ठाकरे यांचे धनुष्यबाण हिसकावून घेतले ! – राणा दांपत्य

शिवसेनेचे धनुष्यबाण हे प्रसिद्ध चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार नवनीत राणा आणि खासदार रवी राणा यांनी ‘मातोश्री निवासस्थानासमोर हनुमानचालिसा पठण करण्यासाठी गेल्यावर आम्हाला १४ दिवस कारागृहात टाकून आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंद केला.