श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना साधिकेला गुरु-शिष्य आणि महाविष्णु-महालक्ष्मी यांच्या एकरूपतेविषयी आलेली अनुभूती

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
कु. चैत्राली कुलकर्णी

‘मी आणि सहसाधिका, दोघी मिळून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना ज्या खोलीत रहातात, त्या खोलीची स्वच्छता करत होतो. तेव्हा मला त्या खोलीतील प्रसाधनगृहातील थंड पाण्याचा नळ चालू केल्यावर त्या नळातून एक नाद ऐकू आला. तेव्हा मला श्रीकृष्णाचे स्मरण होऊन ध्यानावस्था अनुभवता आली. भक्तीसत्संगात एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रसाधनगृहातील ‘फ्लश’ चालू केल्यावर येणाऱ्या पाण्याचा ‘कृष्णविवर नाद’ ऐकवण्यात आला होता. (‘हा नाद ‘कृष्णविवरा’च्या (टीप) नादाप्रमाणे येतो’, असे सनातनच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी त्यांना ईश्वराकडून मिळालेल्या ज्ञानात म्हटले आहे. ’ – संकलक)

टीप – कृष्णविवर ही आकाशातील अशी जागा आहे की, जेथून प्रकाशालाही बाहेर पडता येत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रहात असलेल्या खोलीतील प्रसाधनगृहातील नळातून मला असाच नाद ऐकू आला. यातून मला गुरु-शिष्य आणि महाविष्णु-महालक्ष्मी यांच्या एकरूपतेचे दर्शन घडले.’

– कु. चैत्राली प्रसाद कुलकर्णी (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक