राजकीय नेते आणि भक्त यांच्यातील भेद !
‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मुसलमान साम्यवादी होत नाहीत, तर देवाला न मानणारे हिंदू साम्यवादी होतात. त्यामुळे त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत नाही. साम्यवादी झालेले हिंदू बंगाल आणि केरळ येथे अधिक प्रमाणात असल्याने तेथील हिंदूंची अवस्था केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शरीर, मन आणि बुद्धी यांनी समजेल असे विश्वात १ लक्षांश टक्केही नसतांना त्यांनी कळलेल्या गोष्टींचा बाऊ करणार्यांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
महाविद्यालयातील मित्र, नोकरीतील सहकारी, शेजारी, नातेवाईक इत्यादींशी लहानपणीच्या शाळेतील मित्रांची जवळीक असते, तशी नसते; कारण शाळेतील मित्रांच्या जवळीकीत स्वार्थ नसतो.
‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई वडिलांविषयी कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते.
‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात रहातात !’
‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात मंदिरांचे सरकारीकरण केले जाते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !