विज्ञानाची मर्यादा !
‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गरिबी असणे किंवा नसणे, यामागे ‘प्रारब्ध’ असे काही आहे’, हे ज्ञात नसलेले साम्यवादाच्या गप्पा मारतात आणि गरिबी असणारे किंवा नसणारे यांना समान करण्याचा प्रयत्न करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मानवाला माणुसकी न शिकवणार्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही….
‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी. असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने सारखे संशोधन करावे लागते . याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने संशोधन करावे लागत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराविना दगडाचा एक कणही बनवता येत नाही.
‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’
‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले