आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून धाड टाकणार्‍यांना अटक

या टोळीने जुलैमध्ये विक्रोळीतील एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकून १ लाख रुपयांची रक्कम चोरली.

परळ (मुंबई) येथे पेट्रोल पंपानजीक गॅसवाहिनी फूटून लागलेली आग आटोक्यात

परळ येथील मुख्य चौक परिसरातील मुंबई महानगर पालिकेची गॅस वाहिनी फुटल्याने अचानक आग लागली. पेट्रोल पंपावरील काही कर्मचार्‍यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र गॅसवाहिनी असल्याने त्यांना ते जमले नाही.

मुंबई येथे भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ यांच्या वतीने भव्य ‘गणेशोत्सव स्पर्धा २०२२’चे आयोजन

भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने गणेशोत्सवामध्ये मूर्ती, सजावट-देखावा आणि स्वच्छ परिसर अशा स्वरूपाच्या ३ स्पर्धा आहेत.

संभाजीनगर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक आक्रमक !

शिक्षक रामचंद्र सालेकर यांनी आमदार बंब यांना पत्र लिहिले असून शिक्षकांकडून करून घेण्यात येणार्‍या १५१ अशैक्षणिक कामांची सूची पाठवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे सक्तवसुली संचालनालयाकडून अन्वेषण चालू !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे पूर्वी संचालक असलेल्या ‘ग्रीन एकर’ या आस्थापनाने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार सक्तवसुली संचालनालयाला प्राप्त झाली आहे.

मुंबई येथील मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकर्‍याचा उपचाराच्या वेळी मृत्यू !

२३ ऑगस्ट या दिवशी पावसाळी अधिवेशन चालू असतांना मंत्रालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील तांदूळवाडी गावातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला होता.

उजनी धरणातून ३२ लाख युनिट वीजनिर्मिती !

उजनी धरण सध्या १०० टक्के भरले असून ११ ऑगस्टपासून उजनी धरणातून ‘पॉवर हाऊस’साठी १ सहस्र ६०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडले जात आहे. त्यातून ३२ लाख युनिट वीज सिद्ध करण्यात आली आहे.

‘कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते का ?’, याचे अन्वेषण करून त्याचा अहवाल सादर करा !

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा, तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम २९ आणि ३० यांत सुधारणा करावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले होते.

घुग्गुस (जिल्हा चंद्रपूर) येथे भूस्खलन; घर ७० फूट खोल भूमीत गाडले गेले !  

शहरालगतच्या घुग्गुस येथे कोळसा खाणींचा भाग असलेल्या आमराई वार्डात गजानन माडवी यांचे घर ७० फूट खोल भूमीत गाडले गेले. २६ ऑगस्टला दुपारी ही घटना घडली.

महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखा यांच्या नियोजन अन् समन्वय अभावी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडी नित्याची !

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटली तरी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! तसेच जनतेच्या समस्या सुटण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणार्‍या संवेदनशील व्यक्ती प्रशासनात हव्यात