आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून धाड टाकणार्‍यांना अटक

मुंबई – आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकणार्‍या ४ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

मनोविकारतज्ञ प्रशांत भटनागर, वाहतूक व्यावसायिक वसीम कुरेशी, चालक धीरज कांबळे आणि इजाज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचे सूत्रधार नितीन कोठारी, नीता कांबळे, मरीयम अप्पा आणि शमीम खान या चौघांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने जुलैमध्ये विक्रोळीतील एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकून १ लाख रुपयांची रक्कम चोरली. ही धाड बनावट असल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण करून वरील आरोपींना अटक केली.