घुग्गुस (जिल्हा चंद्रपूर) येथे भूस्खलन; घर ७० फूट खोल भूमीत गाडले गेले !  

  • या सारख्या घटना ही येणार्‍या आपत्काळाची नांदीच होय !

  • कोळसा खाणीचे दुष्परिणाम !

भूस्खलन

चंद्रपूर – शहरालगतच्या घुग्गुस येथे कोळसा खाणींचा भाग असलेल्या आमराई वार्डात गजानन माडवी यांचे घर ७० फूट खोल भूमीत गाडले गेले. २६ ऑगस्टला दुपारी ही घटना घडली. या गावात सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार घडला. सरकारी कोळसा आस्थापना ‘वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड’च्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत; परंतु अशा प्रकारे इतक्या खोल घर भूमीत जाण्याची घटना प्रथमच घडली. घर अचानक हालू लागल्याने घरातील व्यक्ती लगेच घराबाहेर आल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

घटनास्थळी महसूल-खाण प्रशासन, पोलीस पथक, आमदार किशोर जोरगेवार  आले आहेत. परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. परिसरातील कुटुंब अन्यत्र स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.