गड-दुर्गांवर मद्यपान केल्यास ३ मासांची शिक्षा !

या संदर्भात विधी आणि न्याय विभागाला संमतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यातील गड-दुर्गांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याविषयीची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मांडली होती.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने पंढरपूर येथे २० दिवसांचे शाहिरी प्रशिक्षण शिबिर !

महाराष्‍ट्राची शान असलेल्‍या शाहिरी लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्‍यासाठी येथे राज्‍यस्‍तरीय शाहिरी प्रशिक्षणास प्रारंभ करण्‍यात आला आहे.

धान्य वाटपातील ‘कमिशन’चा प्रश्‍न तातडीने सोडवा !- जिल्हाध्यक्ष अशोक कदम

कोरोनाकाळात रेशन दुकानदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून रेशन दुकानदारांना वाहतूक ‘रिबेट’ आणि अन्नधान्य वाटप ‘कमिशन’साठी सातत्याने झगडावे लागत आहे.

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता सत्यात उतरेल ! – अधिवक्ता विलास पाटणे

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांचे हे स्वप्न आता सत्यात उतरेल.

कोकण कृषी विद्यापीठाकडून बागायतदारांना मार्गदर्शक सूचना

सद्यःस्थितीत जिल्ह्यात आंबा आणि काजू हे मोहोर ते फळपक्वतेच्या सर्व अवस्थेमध्ये आहे. हवामान अंदाजानुसार, तापमानात वाढ झाल्यामुळे आंबा फळगळ होण्याची, तसेच फळे भाजण्याची किंवा तडकण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गावर ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चालू करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘समृद्धी महामार्गावर लवकरच ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चालू करणार आहे’, अशी घोषणा केली. यासह ‘महामार्गावर जिथे प्रवेश होतो, तेथेच वाहनातील प्रवाशांची पडताळणी केली जाईल.

यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

वीजदेयक भरले नाही, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, यासाठी राज्यशासन ‘महावितरण’समवेत करार करण्याच्या सिद्धतेत आहे. यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे आश्वासन १३ मार्च या दिवशी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत दिली.

पुरातन मंदिरे आणि वास्तू यांना धक्का न लावता पंढरपूर ‘कॉरिडोर’चे काम करू ! – महाराष्ट्र शासन

श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी करण्यात येणार्‍या ‘कॉरिडोर’च्या कामाविषयी वारकरी, मंदिर समिती, स्थानिक नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी, दिंडीकरी यांच्या समवेत शासनाची बैठक पार पडली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे विधानमंडळाच्या कार्यालयाकडून परिपत्रक !

अशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते !

‘एच्.३ एन्.२’ तापाने महाराष्ट्र बाधित न होण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करावी ! – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच्.३ एन्.२’ तापाच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच्.३ एन्.२’ तापाचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे.