जळगाव येथे ‘व्यसनाची होळी’ उपक्रमाचे आयोजन !

‘व्यसनाची होळी’ जागतिक व्यसनमुक्ती दिनाला का आयोजित केली जात नाही ? होळीच्याच दिवशी असे प्रकार का ? असे केल्यास या सणाला ‘होळी’ म्हणणे योग्य ठरेल का ?

छत्रपती संभाजीनगर विभागात १० दिवसांमध्ये पकडले ९७ कॉपीबहाद्दर !

आधुनिक शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे नैतिकता उंचावत नसून कसेही करून केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याची घातक मानसिकता बळावत आहे.

मांसाहार करून देवदर्शन केल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका !

सुप्रिया सुळे यांनी ४ मार्च या दिवशी मांसाहारी भोजन करून देवस्थानांना भेटी दिल्याची टीका शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी फेसबूकवर पोस्टवर केली होती. यावर ‘माझा या विषयाचा अभ्यास नाही. विजय शिवतारे काय बोलले, मला माहिती नाही’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

उन्ह्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागपूर येथे महापालिकेचा ‘हिट ॲक्शन प्लॅन’ !

राज्यात हळूहळू उन्हाची तीव्रता वाढत आहे. येथील महानगरपालिकेने १५ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘हिट ॲक्शन प्लॅन’ सिद्ध केला आहे

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात ‘ड्रोन’ उडवण्यास बंदी !

मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटार, हँग ग्लाइडर्स, यूएव्ही, यू.ए.एस्., मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोट पायलट एअरक्राप्ट, हॉट एअर बलून, लहान पॉवर एअरक्राफ्ट यांसारख्या हवाई उड्डाणाला अनुमती दिलेली नाही.

कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या ५० खाटांच्या रुग्णालयास संमती !

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी’, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी मान्यता दिल्याने ५० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशासाठी कार्य करणे, ही समाजऋण फेडण्याची संधी ! – अप्पासाहेब धर्माधिकारी

‘रायगड भूषण’ श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना ‘डी.लिट.’ पदवी प्रदान !

१० रुपयांची नाणी स्वीकारावीत, यासाठी लातूर आणि बीड येथे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर !

भारतीय चलनात भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेली १० रुपयांची नाणी काही ठिकाणी स्‍वीकारण्‍यास नकार दिला जात आहे, अशा तक्रारी जिल्‍हा प्रशासनाकडे प्राप्‍त झाल्‍या आहेत.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता निलंबित !

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता आधुनिक वैद्य योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता आधुनिक वैद्य सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर ४ मार्चला निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालवण्यास देऊ नये ! – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत.