श्री. चेतन राजहंस आणि सौ. प्रियांका राजहंस यांच्या विवाहाच्या दिवशी विवाह लागण्यापूर्वी केलेल्या विविध विधींचे सूक्ष्म परीक्षण !

मंगलाष्टके चालू असतांना वर आणि वधू तांदुळाच्या राशीवर उभे होते. तांदुळातील सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी वर आणि वधू यांच्या तळपायांतून त्यांच्या देहात प्रवाहित झाल्यामुळे त्यांचा देह सात्त्विक अन् चैतन्यमय झाला.

‘अघोरास्त्र’ यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण आणि परात्पर गुरु डॉक्टर यज्ञस्थळी उपस्थित  राहिल्यावर यज्ञाच्या परिणामकारकतेवर होणारा परिणाम

यज्ञात प्रत्यंगिरा देवीची सूक्ष्मातून केवळ बाह्यकडा (आऊटलाइन) दिसत होती. ती यज्ञात उभी असून तिचा डावा पाय उजव्या मांडीला टेकवलेला असून तिचे दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर नमस्कार करण्याच्या मुद्रेप्रमाणे दिसत होते.

‘परिशिष्टोक्त ग्रहयज्ञा’चे सूक्ष्म परीक्षण !

४.५.२०१८ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने परिशिष्टोक्त ग्रहयज्ञ संपन्न झाला. यज्ञाच्या पूर्णाहूतीला परात्पर गुरु डॉक्टर उपस्थित होते.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करायच्या विविध यज्ञविधींसाठी करण्यात आलेला संकल्पविधी आणि अन्य उपविधी यांचे सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी विविध यज्ञ करण्यास सांगितले आहे. या सर्व यज्ञांसाठी संकल्प, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध आणि आचार्यवरण हे विधी ४.५.२०१८ या दिवशी करण्यात आले. या विधींचे देवाने करुन घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या यज्ञविधीसाठी यज्ञस्थळी जातांना कपाळावर कुंकवाचा टिळा (नाम) लावून गेल्याने त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

‘४ ते ८ मे २०१८ या कालावधीत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘नवग्रह शांती’, ‘अघोरास्त्र याग’, ‘संधी शांती’ आणि ‘साम्राज्य लक्ष्मी याग’ हे ४ विधी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात येत आहेत.

वर्ष २०१४ मध्ये पू. (सौ.) योया वाले यांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये.

सनातन प्रभातचे समूह संपादक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. शशिकांत राणे यांच्या अंत्यविधीचे सूक्ष्म-परीक्षण !

‘७.४.२०१८ या दिवशी सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक कै. शशिकांत राणे यांच्या पार्थिवावर सनातनचा रामनाथी आश्रम येथे अंत्यविधी आणि फोंडा येथील ‘मुक्तीभवन’ येथे अग्नीसंस्कार करण्यात आले. त्या वेळी देवाने करवलेले सूक्ष्म-परीक्षण पुढे देत आहे.

कै. राणेकाका यांच्या अंत्यविधीचे सूक्ष्म परीक्षण

कै. राणेकाका यांचा देह चैतन्यमय असल्याने त्यात सजीवता जाणवत होती. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असल्याचे मला अधूनमधून जाणवत होते.

चित्रकार-साधिकेने ‘कलेसाठी कला’ नव्हे, तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, म्हणजे ‘साधना’ म्हणून काढलेल्या सूक्ष्म चित्राची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘चित्रकार-साधिका काढत असलेल्या सूक्ष्म चित्रातील स्पंदनांमध्ये तिच्या साधनेमुळे काय पालट झाले ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

तमिळनाडू राज्यात होत असलेल्या हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या मालिकेचे पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केलेले अभ्यासपूर्ण निरीक्षण !

‘तमिळनाडू राज्याला प्राचीन शिल्पे, मंदिरे, विविध कला, शिव आणि विष्णु यांचे भक्त, तसेच पुरातन साहित्य इत्यादींचा समृद्ध वारसा लाभला आहे.


Multi Language |Offline reading | PDF