‘घोड्याची नाल किंवा उंटाची नाल ही लोखंडापासून बनलेली असते. वास्तूच्या प्रवेशद्वारावर नाल लावण्यापूर्वी ती घोडा किंवा उंट यांनी वापरलेली असावी.
१. वास्तूच्या प्रवेशद्वारावर घोड्याची किंवा उंटाची नाल लावल्याने सूक्ष्म स्तरावर होणारी प्रक्रिया
घोडा किंवा उंट यांनी वापरलेली नाल घराच्या प्रवेशद्वारावर लावल्यामुळे घोडा किंवा उंट यांची स्पंदने त्यांच्या नालेमध्ये संक्रमित होऊन घोड्याच्या सत्त्व-रजप्रधान आणि उंटाच्या रज-सत्त्वप्रधान शक्तीने नाल भारित होते. ही नाल वास्तूच्या प्रवेशद्वारावर लावल्याने नालेमध्ये कार्यरत असणारी सत्त्व-रज किंवा रज-सत्त्व प्रधान शक्ती वास्तूमध्ये पंचतत्त्वांच्या स्तरांवर पुढीलप्रमाणे कार्यरत होते.
१ अ. संबंधित पंचतत्त्व, घोड्याची नाल आणि उंटाची नाल यांच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या पंचतत्त्वांचे प्रमाण (टक्के), पंचतत्त्वांच्या स्तरावर सात्त्विक ऊर्जा कार्यरत झाल्यामुळे सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम अन् वास्तूच्या प्रवेशद्वारावर नाल लावल्यामुळे वास्तूतील कोणता भाग शुद्ध होणे ?
२. वास्तूच्या प्रवेशद्वारावर घोड्याची आणि उंटाची नाल लावण्याची पद्धत
वास्तूच्या आध्यात्मिक स्थितीनुसार म्हणजे वास्तूला वाईट शक्तींचा त्रास किंवा ग्रहदोष आहे कि नाही, यानुसार वास्तूच्या प्रवेशद्वारावर घोड्याची किंवा उंटाची नाल कशा प्रकारे लावायची ते ठरवू शकतो.
२ अ. नालेची दोन्ही टोके खालच्या दिशेने लावल्याने होणारे सूक्ष्म परिणाम : वास्तूमध्ये वाईट शक्तींचा त्रास असेल, तर घोडा किंवा उंट यांच्या नालेची दोन्ही टोके खालच्या दिशेने करून लावावीत. त्यामुळे नालेच्या दोन्ही टोकांतून प्रक्षेपित होणार्या शक्तीचा प्रवाह खालच्या दिशेने म्हणजे, पाताळाकडे जाऊन पाताळातून वास्तूकडे येणार्या काळ्या शक्तीचा प्रवाह अवरुद्ध होऊन वास्तूला होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून होतो.
२ आ. नालेची दोन्ही टोके वरच्या दिशेने लावल्याने होणारे सूक्ष्म परिणाम : वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण न्यून असेल, तर नालेची दोन्ही टोके प्रवेशद्वारावर वरच्या दिशेने लावावीत. त्यामुळे नालेच्या दोन्ही टोकांकडे स्वर्गलोक, महर्लाेक किंवा जनलोक यांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विक ऊर्जा ग्रहण केली जाऊन ती ऊर्जा वास्तूमध्ये प्रक्षेपित होते. त्यामुळे वास्तूतील नकारात्मक स्पंदने न्यून होऊन सकारात्मक स्पंदने वाढू लागतात आणि वास्तू आध्यात्मिकदृष्ट्या चांगली होते.
३. घोडा किंवा उंट यांची नाल वास्तूच्या प्रवेशद्वारावर लावल्याने पुढील लाभ होणे : घोड्याची किंवा उंटाची नाल यांच्याकडे विविध देवतांच्या तत्त्वलहरी आकृष्ट झाल्याने ती नाल वास्तूच्या प्रवेशद्वारावर लावल्याने विविध प्रकारचे लाभ होतात.
३ अ. वास्तू आणि वातावरण यांची शुद्धी होणे : नालेकडे सात्त्विक ऊर्जा आकृष्ट होऊन ती दोन्ही टोकांतून वास्तू आणि वातावरण यांमध्ये प्रक्षेपित होऊन त्यांची शुद्धी होते.
३ आ. बाहेरील बाधेला (वाईट शक्तींना) वास्तूत प्रवेश करता न येणे : नालेतून प्रक्षेपित होणार्या देवतांच्या मारक शक्तीच्या लहरींमुळे वास्तूभोवती मारक शक्तीचे वलय निर्माण होते. त्यामुळे बाहेरील बाधेला (वाईट शक्तींना) वास्तूत प्रवेश करता येत नाही.
३ इ. वास्तूतील वाईट शक्तींचा प्रभाव न्यून होणे : नालेतून प्रक्षेपित होणार्या देवतांच्या मारक शक्तीच्या लहरींचे वास्तूतील वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध होऊन त्यांची शक्ती क्षीण होते आणि त्यांचा प्रभाव न्यून होतो.
३ ई. वास्तू आणि वास्तूतील व्यक्ती यांना ग्रहदोष न लागणे अन् शनीची बाधा दूर होणे : नाल लोखंडाची असल्याने आणि लोखंड शनीला प्रिय असल्याने वास्तूच्या द्वारावर लोखंडाची नाल लावल्याने शनिदेव प्रसन्न होतो. नालेकडे विविध ग्रहांची स्पंदने आकृष्ट झाल्याने नाल लावल्यामुळे वास्तूतील व्यक्तींवर विविध ग्रहदेवतांचीही कृपा होते. त्यामुळे वास्तूला आणि वास्तूतील व्यक्तींना ग्रहदोष लागत नाही अन् शनीची बाधाही दूर होते.
३ उ. वास्तूत रहाणार्या व्यक्तींना होणार्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्या न्यून होणे : नालेच्या माध्यमातून वास्तूमध्ये सात्त्विकता पसरून वास्तूतील रज-तमात्मक स्पंदने न्यून होऊ लागतात. वास्तूतील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे वास्तूत रहाणार्या व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्या न्यून होऊ लागतात.
३ ऊ. वास्तूत रहाणार्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होणे : नालेच्या माध्यमातून कुबेर आणि लक्ष्मी तत्त्व वास्तूमध्ये कार्यरत झाल्यामुळे वास्तूतील आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात.
३ ए. वास्तूत सुख, समृद्धी आणि शांती नांदणे : वास्तूमध्ये धन्वन्तरिचे तत्त्व कार्यरत झाल्याने आरोग्य, लक्ष्मीतत्त्व कार्यरत होतात. त्यामुळे समृद्धी आणि संपदा अन् शिवतत्त्व कार्यरत झाल्याने शांती नांदू लागते.
३ आ. घोड्याची नाल आणि उंटाची नाल लावल्यामुळे होणार्या लाभांचे प्रमाण (टक्के)
४. घोड्याची नाल आणि उंटाची नाल यांतील भेद
अन्य प्राण्यांच्या तुलनेत घोड्याच्या पायांतून पुष्कळ प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असल्याने तिला ‘अश्वशक्ती (हॉर्स पॉवर)’, असे संबोधले जाते. वास्तूच्या प्रवेशद्वारावर उंटाच्या नालेपेक्षा घोड्याची नाल लावल्याने अधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२०, रात्री १०.४५)
|